पोवार राजाभोज जयंती थाटात
By admin | Published: February 15, 2016 01:57 AM2016-02-15T01:57:32+5:302016-02-15T01:57:32+5:30
स्थानिक गजानन मंदिरातून राजा भोज जयंतीनिमित्त शोभायात्रेची सुरूवात करण्यात आली.
तिरोडा व अर्जुनीत कार्यक्रम : शोभायोचे आयोजन
तिरोडा : स्थानिक गजानन मंदिरातून राजा भोज जयंतीनिमित्त शोभायात्रेची सुरूवात करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील टॉकीजपासून जुनी वस्ती पोलीस स्थानकापासून तुमसर-गोंदिया रोड होत पोवार समाज भवन प्रगतीनगर तिरोडा येथे समारोप करण्यात आला.
शोभायात्रेची सुरूवात आ. विजय रहांगडाले, जि.प. सदस्य कैलाश पटले, डॉ. सुशील रहांगडाले, पंचम बिसेन, राधेलाल पटले, डिलेश पारधी, प्रकाश ठाकरे, अनुप बोपचे, बाबा भैरम, डॉ. अनिल पारधी, डॉ. चिंतामण रहांगडाले, डॉ. वसंत भगत यांच्या उपस्थितीत झाली. शोभायात्रेत चित्ररथांचा वापर करण्यात आला. त्यात बेटी बचाओ चित्ररथ आकर्षित करीत होते.
वडेगाव : पोवार राजाभोज शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी स्थानिक सरपंच बघेले यांच्या अध्यक्षतेखाली पं.स. सदस्या नीता रहांगडाले यांनी पूजन करून शोभायात्रा रवाना केली. गाव प्रदक्षिणेनंतर गांधी चौकात यात्रेचे विसर्जन करण्यात आले. यावेळी माजी आ. डॉ. खुशाल बोपचे म्हणाले, देशातील विविध भागात पोवार समाज विखुरला आहे. देशातील पोवार समाजाची लोकसंख्या सुमारे १६ टक्के आहे. मात्र विखुरलेल्या पोवार समाजास त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणे गरज आहे. पोवार राजाभोज जयंती उत्सव समितीच्यावतीने स्थानिक गांधी चौकात पोवार राजाभोज जयंतीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संपूर्ण बोली भाषेत झालेल्या या जयंती उत्सवात डॉ. बोपचे यांनी पोवार समाजाचा इतिहास व समाजातील इतर पोटजातीचा उल्लेख करीत अस्तित्वाची जाणीव करून दिली. दीप प्रज्वलन जि.प. सदस्या राजलक्ष्मी तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी जि.प. सदस्या वीणा बिसेन, पं.स. सदस्या नीता रहांगडाले, माजी पं.स. सदस्य तेजराम चव्हाण, संभाजी ठाकरे, अनुप बोपचे, गुलाम ठाकरे, घासीराम पटले, पंचम बिसेन, रामलाल रहांगडाले उपस्थित होते. यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटीत होण्याचे आवाहन केले. रात्रीला मागडकालिका देवी व पोवारी आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. संचालन मोरेश्वर ठाकरे, प्रास्ताविक प्रवीण अंबुले, आभार एच.एम. रहांगडाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)