वीजेची बचत काळाची गरज आहे - झरारिया
By admin | Published: January 17, 2016 01:42 AM2016-01-17T01:42:12+5:302016-01-17T01:42:12+5:30
वीजेची बचत ही काळाची गरज आहे. योग्य वापर केला तर भविष्यात मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होऊ शकते.
तिरोडा : वीजेची बचत ही काळाची गरज आहे. योग्य वापर केला तर भविष्यात मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होऊ शकते. विद्यार्थ्यांनी वीज सुरक्षेबाबत व वापराबाबत जागरूक असावे, असे प्रतिपादन शहीद मिश्रा विद्यालयाचे अध्यक्ष रमेश झरारीया यांनी केले.
तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताहाअंतर्गत आयोजित कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, मुख्याध्यापक रमण नागपुरे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुनील मोहुर्ले व विद्युत कंत्राटदारांचे प्रतिनिधी प्रभाकर रावत उपस्थित होते.
खापर्डे यांनी विद्यार्थ्याना वीजेचे महत्व व वीजेच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले. रमण नागपूरे यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहात आत्मसात केलेल्या बाबी अंमलात आणाव्या असे सांगून वीज सुरक्षा व वापराबाबत सदैव जागरु क राहावे असे सांगितले. सुनील मोहुर्ले यांनी विद्यार्थ्यांना वीज निर्मिती ते वीज वितरण पर्यंतची कार्यपद्धतीबाबत माहिती दिली.
कार्यक्र माचे संचालन कनिष्ठ अभियंता राजेश आकरे यांनी केले. मुख्य कार्यक्र माला वीज वितरण कंपनीचे अधिकारी/कर्मचारी, दिनेश देशमुख, किशोर येसनसुरे, आशिष साहुसाकडे, राहुल परचाके, वीज कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी नानुरे, आगलावे, मुलचंदानी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.