दिवाळीत गायगोधनावर पाळीव पशू खेळवण्याची प्रथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:18 PM2017-10-20T16:18:49+5:302017-10-20T16:21:26+5:30

दिवाळीनिमित्त देशाच्या विविध भागात विविध प्रकारच्या पूजा, प्रथा पार पाडल्या जातात. ज्या त्या त्या प्रदेशात अत्यंत महत्त्वाच्या व पारंपारिक रीतीरिवाजांच्या स्थानी असतात.

Practice of playing a pet in the cows shit in Diwali | दिवाळीत गायगोधनावर पाळीव पशू खेळवण्याची प्रथा

दिवाळीत गायगोधनावर पाळीव पशू खेळवण्याची प्रथा

Next
ठळक मुद्देलहान बाळांनाही देतात गोधनाची कूसगाय-बैलांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची प्रथा

आॅनलाईन लोकमत
लालसिंग चंदेल
गोंदिया-दिवाळीनिमित्त देशाच्या विविध भागात विविध प्रकारच्या पूजा, प्रथा पार पाडल्या जातात. ज्या त्या त्या प्रदेशात अत्यंत महत्त्वाच्या व पारंपारिक रीतीरिवाजांच्या स्थानी असतात. अशीच एक प्रथा आदिवासीबहुल भागात कित्येक पिढ्यांपासून पाळली जात आहे. ती म्हणजे गोधनावर पशू खेळवण्याची प्रथा. महाराष्ट्राच्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या आदिवासीबहुल भागातील काही गावांमध्ये ही प्रथा आजही मोठ्या नेमाने पाळली जाते.
गोधन म्हणजे गायीचे शेण व त्यात झाडपाला टाकून तयार केलेली गादी वा छोटासा ढीग असतो. या ढिगावर गावातील पशूंनी लोळवले जाते, खेळवले जाते. तसे करण्याने त्यांची प्रकृती उत्तम राहते असा विश्वास या आदिवासी बांधवांना वाटतो. याचबरोबर गावातील नवजात बाळांनाही या गोधनावर थोड्या वेळासाठी ठेवले जाते. त्यांच्याही वाढीसाठी निकोप असे हे गोधन असल्याचा दावा येथील आदिवासी मंडळी करतात. गोंदिया जिल्ह्यातल्या पांढरी गावात ही गोधनाची प्रथा गावकºयांनी शुक्रवारी सकाळी विधीवत पार पाडली.

Web Title: Practice of playing a pet in the cows shit in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.