प्रफुल्ल पटेल यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:59+5:302021-09-26T04:30:59+5:30

तिरोडा : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक विकासकामे ही खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राबविली जात आहेत. ते या दोन्ही जिल्ह्यांचे ...

Praful Patel's work should be communicated to the people | प्रफुल्ल पटेल यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवावे

प्रफुल्ल पटेल यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवावे

googlenewsNext

तिरोडा : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक विकासकामे ही खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राबविली जात आहेत. ते या दोन्ही जिल्ह्यांचे खासदार नसतानासुद्धा त्यांची जिल्ह्याच्या विकासासाठी तळमळ कायम आहे. कोविड संसर्गकाळातसुद्धा ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. धानाला ७०० रुपये बोनस व थकीत चुकारे मिळवून दिले. त्यामुळे त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे प्रतिपादन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक नेहरू सहकारी भात गिरणी वडेगाव येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, डॉ. अविनाश जयस्वाल, कैलास पटले, अजयसिंग गौर, योगेंद्र भगत, ओमकार लांजेवार, मनोज डोंगरे, राजू एन. जैन, संभाजी ठाकरे, विना बिसेन, टुंडीलाल शरणागत, सुनीता मडावी, जया धावडे, मंजुळा लांजेवार, डॉ. किशोर पारधी, नीता रहांगडाले, रोशन बागडे, नेपालचंद भास्कर, जितेंद्र पारधी, किरण बंसोड, संदीप मेश्राम, वाय. टी. कटरे, नासीर धानीवाला, देवेंद्र चौधरी, मनोहर राऊत, राजू ठाकरे, धानसिंगभाऊ बघेल, सिद्धार्थ कावळे, सीमा वासनिक उपस्थित होते. माजी आ. जैन म्हणाले, जनतेची छोटी छोटी कामे असतात. ती पूर्ण केल्यास पक्षाचा विस्तार होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारधारेवर काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले.

विजय शिवणकर यांनी जि.प. पर्यवेक्षक व बुथप्रमुखांनी समन्वय साधून गावात बैठका लावाव्यात. सोबतच जेथे पक्ष कमकुवत वाटत असेल तेथे पक्षबांधणी करण्याचे काम करण्यास सांगितले.

Web Title: Praful Patel's work should be communicated to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.