प्रहार दिव्यांग संघटना करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा पाठपुरावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:29+5:302021-08-18T04:34:29+5:30

प्रहार दिव्यांग अधिकारी-कर्मचारी संघटनेची सर्व जिल्हा पदाधिकारी व सभासदांची जिल्हास्तरीय सभा शिक्षक सोसायटीत घेण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालचंद डोहळे ...

Prahar Divyang Sanghatana to pursue injustice against Divyang employees () | प्रहार दिव्यांग संघटना करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा पाठपुरावा ()

प्रहार दिव्यांग संघटना करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा पाठपुरावा ()

Next

प्रहार दिव्यांग अधिकारी-कर्मचारी संघटनेची सर्व जिल्हा पदाधिकारी व सभासदांची जिल्हास्तरीय सभा शिक्षक सोसायटीत घेण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालचंद डोहळे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या सभेला जिल्हासचिव हितेशकुमार रहांगडाले, सहकोषाध्यक्ष रामेश्वर गोन्नाडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हासचिव रहांगडाले यांनी प्रास्ताविक मांडले. अध्यक्ष डोहळे यांनी झालेल्या कामांची दिली. सहकोषाध्यक्ष गोन्नाडे यांनी संघटनेची दिशा व कार्यपद्धती यावर प्रकाश टाकला. यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करून आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच नवीन सभासद नोंदणी व चालू वर्षातील वर्गणीसंदर्भात चर्चा करण्यात आली व मनीषा सेवईवार यांना सभासद बनवून सभासद नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे, दिव्यांग कर्मचारी पदोन्नती व सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करण्याबाबत सर्व विभागांकडे पाठपुरावा करण्याचे तसेच अन्याय होत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभागप्रमुखांना भेटून समस्या निकाली काढण्याचे ठरविण्यात आले. यावेळी संघटनेचे सदस्य राजेश भोंगाडे, प्रफुल धमगाये, लक्ष्मीनारायण शहारे आदी उपस्थित होते.

Web Title: Prahar Divyang Sanghatana to pursue injustice against Divyang employees ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.