प्रतापगड पहाडीवर स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:33 PM2018-02-11T21:33:56+5:302018-02-11T21:34:39+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ख्याती असलेल्या भगवान महादेव शिवशंकर पहाडी व यात्रा परिसरात ........
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ख्याती असलेल्या भगवान महादेव शिवशंकर पहाडी व यात्रा परिसरात अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व गोठणगावचे वनक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या नेतृत्वात वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवून सर्वत्र सफाई करण्यात आली.
प्रतापगड येथे येत्या मंगळवारपाूसन (दि.१३) महाशिवरात्रीची भव्य यात्रा भरणार आहे. लांबदूरुन लाखो श्रद्धाळू महादेवाला नतमस्तक होऊन नवस फेडायला येतात.
या परिसरात व पहाडीवर जाताना भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अर्जुनी-मोरगाव व गोठणगाव वनविभागाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यांतर्गत सर्वत्र सफाई करुन मार्ग ये-जा करण्यासाठी सज्ज करण्यात आले. स्वच्छता अभियानात पहिल्या पायरीपासून, अंबामायची नाहणी, शिवमंदिर मधील गुफा तसेच यात्रा परिसर स्वच्छ करण्यात आले.
स्वच्छता अभियानात वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांंगडाले, मेंढे, क्षेत्रसहायक दखणे, तुरकर, चांदेवार, पंधरे यांच्यासह इतर वनकर्मचारी, वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.