प्रतापगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:22 AM2018-08-11T00:22:59+5:302018-08-11T00:26:05+5:30

प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत.

Pratapgad's scurry | प्रतापगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

प्रतापगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

googlenewsNext
ठळक मुद्देगावात दहशत : प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत.
प्रतापगड या गावाला लागून पहाड व जंगल आहे. जंगलाला लागूनच गावच्या मध्यभागी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. सुमारे दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. १ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शालेय परिसरात बिबट आढळून आला होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका संभवतो. शालेय प्रशासनाने याची उपवनसंरक्षकांकडे तक्रार करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
गोठणगावच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी लगेच या पत्राची दखल घेऊन उपवनसंरक्षकांना मार्गदर्शन मागविले आहे. हा बिबट साधारणपणे अंधार पडल्यानंतर गावात येतो. कोंबड्या, कुत्रे, कबूतर यावर ताव मारुन आपली भूक भागवितो. त्याने गावातीलच एका मुलीवर झेप घेतली. मात्र त्यातून ती बचावली अशाही चर्चा आहेत. बिबटच्या या वावरामुळे गावकºयांनी जंगलाच्या दिशेने जाणे टाळले आहे. बिबटच्या अधिवास तपासणीसाठी वनविभागातर्फे गावात मुख्य ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. पिंजरे सुद्धा आणून ठेवले आहेत. गाव व जंगल परिसरात कार्यरत बिट वनरक्षकाची आळीपाळीने गस्त केली जात आहे. गस्त करीत असतांना उपाययोजना म्हणून फटाके फोडून आवाज केला जात आहे. आदि उपाययोजना वनविभाग काटेकोरपणे करीत आहे. एकापेक्षा अधिक बिबट असण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त केली आहे. उपवनसंरक्षक यावर काय निर्णय घेतात याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.
गोठणगावात कोंबड्या केल्या फस्त
बिबट्याने सोमवारी (दि.६) सदाराम औराशे यांच्या बकºया खाऊन फक्त केल्या. तर मुकुंदा जमदाळ, गोविंदा कलाम, रमेश हटवार आणि राजेंद्र वालदे यांच्या घरातील कोंबड्याही बिबट्याने खाऊन फस्त केल्या आहेत. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिक दशहतीत असून रात्रीला घराबाहेर निघणे कठिण झाले आहे. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एवढेच नाही तर एकट्या लाल तोंड्या बंदराचा उपद्रव गावात वाढला आहे. बंदर घरावरचे कवेलू काढून घरातील भात-भाजी, तांदुळ-गहू भाजीपाला खात अहे. ग्यानीराम काळसर्पे व प्रकाश राऊत यांच्या घरावरील कवेलू काढून भात-भाजी खाऊन फस्त केले. बंदरामुळे उपाशी राहण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.

Web Title: Pratapgad's scurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.