सरांडी येथे खरीपपूर्व शेतकरी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:53+5:302021-06-23T04:19:53+5:30

याप्रसंगी खंडाईत यांनी, बीजप्रक्रियाविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी, असे सांगितले. कृषी सहायक विशाल साटकर यांनी, ...

Pre-kharif farmer guidance at Sarandi | सरांडी येथे खरीपपूर्व शेतकरी मार्गदर्शन

सरांडी येथे खरीपपूर्व शेतकरी मार्गदर्शन

Next

याप्रसंगी खंडाईत यांनी, बीजप्रक्रियाविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी, असे सांगितले. कृषी सहायक विशाल साटकर यांनी, भात लागवडीच्या विविध पद्धतींविषयी मार्गदर्शन केले. घनश्याम चौधरी यांनी, संतुलित खताचा वापर आणि भात पिकाला लागणारी खत मात्रा यावर मार्गदर्शन केले. एस.जी. चव्हाण यांनी, कृषिक ॲप डाउनलोड करून कृषी विभागाच्या विविध योजना तसेच गणकयंत्रबाबत मार्गदर्शन केले. संदीप मेश्राम यांनी, फळबाग लागवड, महात्मा गांधी रोजगार हमी योजनाविषयी मार्गदर्शन केले. तसेच सगुणा भात लागवड, कृषीक ॲप एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन बीजप्रक्रिया, जैविक, भौतिक नियंत्रण, ५ टक्के निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क या विषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मोहाडीकर यांनी मांडले. संचालन चौधरी यांनी केले. आभार कृषी सहायक आर.यू.बारई यांनी मानले.

Web Title: Pre-kharif farmer guidance at Sarandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.