पारंपरिक देशी धानाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:17 PM2017-11-03T23:17:57+5:302017-11-03T23:18:08+5:30

महाराष्टÑ जनुक कोष कार्याक्रमांतर्गत ग्रामीण युवा प्रगतिक मंडळ भंडारा यांच्या सौजन्याने प्रायोगिक तत्त्वावर कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी पारंपरिक देशी धानाचे वाण हिराणकीची.....

Preferred traditional country wealth | पारंपरिक देशी धानाला प्राधान्य

पारंपरिक देशी धानाला प्राधान्य

Next
ठळक मुद्देकन्हारपायलीच्या शेतात बहरले हिराणकी वाण

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : महाराष्टÑ जनुक कोष कार्याक्रमांतर्गत ग्रामीण युवा प्रगतिक मंडळ भंडारा यांच्या सौजन्याने प्रायोगिक तत्त्वावर कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी पारंपरिक देशी धानाचे वाण हिराणकीची लागवड करुन भरघोस उत्पन्न मिळविले. इतर शेतकºयांनी सुद्धा दैनंदिन उपयोगासाठी या धानाची लागवड अवश्य करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकेकाळी नावाजलेले हिराणकी धानाचे वाण सद्यस्थितीत लुप्त झाल्यासारखे आहे. मात्र सडक-अर्जुनी तालुका कृषी प्रेरक गिरधारी बन्सोड यांच्या मार्गदर्शनात कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी आपल्या शेतात अडीच किलो हिराणकी धानाची लागवड प्रायोगिक तत्वावर केली होती. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा व कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने सोनबोरू, तरोटा व रोग खताचा उपयोग करुन धानाची लागवड केली होती.
हिराणकी हा देशी धान असून १३५ ते १४५ दिवसात त्याचे पीक हाती मिळते. त्याचप्रमाणे उत्पादित धानाच्या एका लोंबीत २८० ते २९० पर्यंत दाणे असतात. हे वाण सुगंधित असून बारीक आहे. सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे या धानावर कोणत्याच प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे जवळपासच्या शेतकºयांनी आगाऊ मागणी केल्याचे शहारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पारंपरिक देशी वाण रसायनमुक्त, कमी खर्चाचे व निसर्गचक्राला पोषक आहे. जसे पृथ्वीतलावरील जीवजंतूना समानतेने जगण्याचा अधिकार आहे व विषमुक्त अन्न सर्वांना ग्रहण करण्यात अधिकार आहे, त्याप्रकाराने विषमुक्त अन्न मिळू शकते. ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे उत्तम बियाणांचा उपयोग केल्यास त्यापासून मिळणारी फळेसुद्धा शरीरास पोषक व विषमुक्त असू शकते. त्यामुळे येणारी पिढी रोगमुक्त तयार होईल. त्यासाठी पारंपरिक देशी धानाच्या पिकांचे स्वस्थळी संरक्षण व संगोपन करणे काळाची गरज आहे.
नामशेष होणाºया पारंपरिक पिकांच्या जातीची जोपासना करुन देशाच्या विकासात प्रत्येकाने हातभार लावावे, असे मत शेतकरी शहारे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Preferred traditional country wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.