जिल्ह्यात लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; एकही केंद्रावरून गर्भवतींचे लसीकरण नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:38+5:302021-07-21T04:20:38+5:30
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहून तिसरी लाट येण्यापूर्वीच बहुतांश नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी शासनाने सर्वांचे लसीकरण करायला सुरुवात ...
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहून तिसरी लाट येण्यापूर्वीच बहुतांश नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी शासनाने सर्वांचे लसीकरण करायला सुरुवात केली आहे. कोरोनाची लस ही गर्भवती महिलांनाही लाभदायक असल्याने लसीकरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. परंतु गर्भावस्थेत दोन-दोन जीवांना सांभाळताना लस घेतल्यास काही अनिष्ट तर घडणार नाही अशी धास्ती घेऊन लसीकरण करण्यासाठी गर्भवती महिला पुढे येत नाही. जिल्ह्यात ६४४४ गर्भवती आजघडीला आहेत. परंतु त्या गर्भवतींनी लसीकरण केले नाही. जिल्ह्यात १८ वर्षे वयोगटातील तरुण लसीकरणासाठी पुढे येत आहेत. परंतु गर्भवती महिला व स्तनदा माता लसीकरणासाठी पुढे यायला तयार नाहीत. जिल्हाभरातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हास्तरावरील सर्वच शासकीय रुग्णालयात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही लस उपलब्ध आहेत. परंतु या लसीकरणासाठी गर्भवती महिला पुढे येत नाहीत.
..........................
कोट
गर्भवती महिला सुरक्षित असेल तर तिने गर्भावस्थेत लसीकरण करायला काहीच हरकत नाही. गर्भावस्थेत गर्भवतीची प्रकृती नाजूक असेल किंवा एखादा आजार असेल तर त्या महिलेने लसीकरण करू नये. सामान्य गर्भवतींना लसीकरण करता येईल.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी
......................
दोन जीवांची भीती
सर्वसामान्य लोकच लस घ्यायला घाबरत असताना गर्भावस्थेत दोन जीव सांभाळताना लस घ्यायची किंवा नाही याची भीती वाटते. पोटात बाळ नसते तर लस घेतली असती. लस घेण्यासंदर्भात आम्ही आतापर्यंत कसलाच विचार केला नाही.
- एक गर्भवती
.....
गर्भावस्थेत लस घेण्याची भीती वाटत आहे. कोरोनाच्या दहशतीने आम्ही लसीलाही घाबरत आहोत. गर्भावस्थेत असलेल्या अनेक औषधांमुळे लस घ्यावी की नाही हे आपल्या डॉक्टरांना आधी विचारू. डॉक्टरांनी लस घेण्याची परवानगी दिली तरच लस घेणार.
- एक गर्भवती
.....................
तीन केंद्रांवर लोकमत
१) भानपूर
एकूण लसीकरण------ पहिला डोज----- दुसरा डोज
स्त्री ४८०८ -------------४८०८-----------९४५
पुरुष ७२९७------------७२९७-------------१५११
गर्भवती स्त्री ००---------००------------------------००-
२) एकोडी
एकूण लसीकरण------ पहिला डोज----- दुसरा डोज
स्त्री ३३०४--------------३३०४--------------२२८
पुरूष ३९८७--------------३९८७-------------१७३५
गर्भवती स्त्री-------------००--------------००-
३) रावणवाडी
एकूण लसीकरण------ पहिला डोज----- दुसरा डोज
स्त्री २८५५-------------२८५५------------२०५
पुरुष ५८७४-------------५८७४-----------१६४१
गर्भवती स्त्री--००---------००--------------००-