गरोदर महिलांनाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 05:00 AM2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:11+5:30
लसीकरणापासून कुणीची सुटू नये यासाठी आता १८-४४ वयोगटाला परवानगी देण्यात आली असून लहान मुलांसाठीही वेगवेळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात प्रश्न होता तो फक्त गरोदर महिलांचा कारण, लसीचा प्रभाव दोन जीवांवर पडणार असल्याने गरोदर महिलांना लस देण्यावर संसोधन सुरू होते. या संशोधनात कोरोनाची लस गरोदर महिलांसाठीही सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले असून गरोदर महिलांनाही आता लस घेता येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कहराची परिस्थिती कानी पडताच आजही अंगावर काटे उभे राहतात. यामुळे आता पुढे कोरोनाची लाट आपल्या देशात येऊच द्यायची नसेल तर जास्तीत जास्त लसीकरण करावे अशा सूचना शास्त्रज्ञांनीही दिल्या आहेत. त्यानुसार, देशात लसीकरणाची मोहीम आता एक चळवळ म्हणून राबविली जात आहे. यामुळेच लसीकरणापासून कुणीची सुटू नये यासाठी आता १८-४४ वयोगटाला परवानगी देण्यात आली असून लहान मुलांसाठीही वेगवेळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात प्रश्न होता तो फक्त गरोदर महिलांचा कारण, लसीचा प्रभाव दोन जीवांवर पडणार असल्याने गरोदर महिलांना लस देण्यावर संसोधन सुरू होते. या संशोधनात कोरोनाची लस गरोदर महिलांसाठीही सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले असून गरोदर महिलांनाही आता लस घेता येत आहे. मात्र लस घेणे त्यांची ऐच्छीक बाब असून लस घेतल्यानंतर कित्येकांना ताप, अंगदुखी, मळमळ सारखे त्रास जाणवतात. अशात गरोदर महिलांना असे त्रास जाणवल्यास त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणेच गरजेचे असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गरोदर महिलांनी घ्यावयाची काळजी
गरोदर महिलांचा स्त्रीरोगतज्ज्ञांकडे उपचार सुरूच असतो. अशात लस घेण्याबाबत त्यांनी आपल्या डॉक्टरांशी सल्ला घ्यावा.
कोरोनाची लस घेणे गरोदर महिलांसाठीही ऐच्छिक आहे. मात्र कोरोनाची लस ही ‘लाईफ सेव्हिंग’ लस असल्याने कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने ती घेणे गरजेचे आहे. शिवाय, गरोदर महिलांसाठीही ती सुरक्षित असल्यानेच शासनाने गरोदर महिलांसाठीही लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र तरीही गरोदर महिलेला लस घ्यावयाची असल्यास सर्वप्रथम याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कारण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालणे कधीही सुरक्षित आहे. शिवाय लस घेतल्यानंतर त्रास झाल्यास आपल्या मर्जीने कोणतेही औषध न घेता थेट डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. कारण, हा दोन जीवांचा प्रश्न आहे.
गरोदर महिलांनी लस घेणे ही त्यांची ऐच्छिक बाब आहे. मात्र लस घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, मळमळ यासारखे त्रास कित्येकांना जाणवत आहेत. गरोदर महिलांनाही हे त्रास जाणवल्यास घाबरण्याची गरज नाही. मात्र १-२ दिवसांपेक्षा जास्त दिवस हे त्रास असल्यास लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रणिता चिटणवीस, स्त्रीरोगतज्ज्ञ, गोंदिया.
कोरोनापासूनच बचावासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. मात्र गरोदर महिलांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास असल्यास महिलांनी फक्त पॅरासिटामॉल घ्यावी. जास्तच त्रास असल्यास अन्य कुणाच्याही सांगण्यावरून कोणतेही औषध घेऊ नये. थेट आपल्या डॉक्टरांशीच संपर्क साधावा.
- डॉ. मेघा रत्नपारखी, स्त्रीरोगतज्ज्ञ, गोंदिय