पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:48+5:302021-01-19T04:30:48+5:30
कोरोना संकटावर मात करीत शासनाने, नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करून, आता पाचवी ते आठवी वर्गासह शाळा ...
कोरोना संकटावर मात करीत शासनाने, नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करून, आता पाचवी ते आठवी वर्गासह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एका बाकावर एक अशा पद्धतीने विद्यार्थी संख्या बैठक व्यवस्था करताना, मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेत हॅन्डवॉश सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन आदी साहित्य उपलब्धतेसाठी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मुख्याध्यापक मंडळींना कस लागणार आहे. यासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. मागील दोन वर्षांपासून शाळांना वेतनेतर अनुदान दिल्या गेली नाहीत. त्यामुळे खासगी व्यवस्थापनांच्या मुख्याध्यापकांनी कशी व्यवस्था करावी, याची चिंता वाटायला लागली आहे. त्याचबरोबर जून महिन्यात उघडणाऱ्या शाळा आता जानेवारीत तब्बल आठ महिन्यांनंतर विलंबाने सुरू होत असल्याने, अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा, याची चिंता सतावत असली, तरीही शाळेतील पाचवी ते आठवी वर्गासह शाळा सुरू करण्याची पूर्व तयारी शाळा प्रशासनाने सुरू केली आहे.