नवरात्रौत्सवाची तयारी जोमात

By admin | Published: October 5, 2015 02:04 AM2015-10-05T02:04:25+5:302015-10-05T02:04:25+5:30

गणरायाला निरोप दिल्यानंतर आता नवरात्रौत्सव काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती

Preparations for Navratri | नवरात्रौत्सवाची तयारी जोमात

नवरात्रौत्सवाची तयारी जोमात

Next

मूर्तिकार व्यस्त : मंडप उभारणीचे काम जोमात
गोंदिया : गणरायाला निरोप दिल्यानंतर आता नवरात्रौत्सव काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती असून शहरात उत्सवाची तयारी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. गणरायाला निरोप देऊन मुर्तीकार आता दुर्गामातेच्या मुर्त्या साकारण्यात व्यस्त दिसून येत आहेत. तर मंडळांकडून मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या १३ तारखेला मातेचे आगमन होणार असल्याने सर्वांनाच तिच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे.
राज्याच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो. त्यातही विशेष म्हणजे गोंदिया शहरात नवरात्रोत्सवाची धूम काही औरच असते. यामुळेच येथील नवरात्रौत्सवाची दूरवर ख्याती आहे. या प्रसिद्धीमुळेच मध्य प्रदेश व छत्तीसगडसह दूरवरून भाविक येथील उत्सवाची भव्यता बघण्यासाठी नवरात्रौत्सवाच्या काळात गोंदियात येतात. त्यामुळेच येथील उत्सवाची भव्यता दरवर्षी वाढतच चालली आहे. हजारोंच्या संख्येत नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक गोंदियात येत असल्याने या नऊ दिवसांत शहर गजबजलेले असते. शिवाय नऊ दिवस दुर्गामातेचा विराजमान राहत असल्याने हे दिवस नवचैतन्याने भरलेले असतात.
येत्या १३ तारखेला घटस्थापना असून मातेचे आगमन होणार असल्याने मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. आपले मंडप वेगळे व आकर्षक बनावे यासाठी मंडप उभारणी जोमात सुरू आहे. त्यातही येथील काही मंडळांच्या उत्सवाची ख्याती असल्याने त्यांचे काम जोमात सुरू आहे. शिवाय मूर्तिकारही घेतलेल्या आॅर्डरच्या मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या परिवारासह सध्या व्यस्त दिसून येत आहेत. तर मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या तयारी व वर्गणीत व्यस्त आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Preparations for Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.