जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 09:42 PM2019-07-30T21:42:13+5:302019-07-30T21:42:47+5:30

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

The presence of rainfall everywhere in the district | जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देबळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा : पिकांना संजीवनी, शेतकरी लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा महिना म्हणून ओळखला जाणार जुलै महिना अर्ध्याहून अधिक लोटूनही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टरमधील धानाचे पऱ्हे आणि १२०० एकरमधील रोवणी संकटात आली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.दोन तीन दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले असते. मात्र रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. ही रिपरिप मंगळवारी सकाळी १० वाजतापर्यंत कायम होती. त्यामुळे कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली.
मंगळवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोर ८४.४, महागाव ८७.४ आणि केशोरी ९६.४ मि.मी. पाऊस झाल्याने या तिन्ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पावसाअभावी अजुनही नदी, नाले भरलले नाहीत.
पावसाची तूट कायम
जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान सरासरी ६५९.४८ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा ३० जुलैपर्यंत केवळ ३७६.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहिल्यास जवळपास ४३ टक्के पावसाची तूट कायम आहे.

Web Title: The presence of rainfall everywhere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.