हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘नानीबाई का मायरा’चा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:09 PM2019-02-18T22:09:00+5:302019-02-18T22:09:24+5:30
जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाची मनोकामना घेवून मनोहरभाई पटेल अॅकडमीतर्फे पूज्य राधा स्वरुपा जयकिशोरी यांच्या मधुर वाणीत नानीबाई का मायरा हा तीन दिवसीय कथा कार्यक्रम येथील सर्कस मैदानावर आयोजित करण्यात आला होता. आज (दि.१८) हजारो भाविकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला. या वेळी खा. प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांनी राधा स्वरुपा जयकिशोर यांचा ओढणी देऊन सत्कार केला. तसेच या वेळी त्यांनी विधीवत पूजा अर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाची मनोकामना घेवून मनोहरभाई पटेल अॅकडमीतर्फे पूज्य राधा स्वरुपा जयकिशोरी यांच्या मधुर वाणीत नानीबाई का मायरा हा तीन दिवसीय कथा कार्यक्रम येथील सर्कस मैदानावर आयोजित करण्यात आला होता. आज (दि.१८) हजारो भाविकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला. या वेळी खा. प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांनी राधा स्वरुपा जयकिशोर यांचा ओढणी देऊन सत्कार केला. तसेच या वेळी त्यांनी विधीवत पूजा अर्चा केली.
या वेळी खा.मधुकर कुकडे, माजी आ.राजेंद्र जैन, किरण पटेल, भिखुभाई पटेल, माजी आ.दिलीप बन्सोड, नगराध्यक्ष अशोक इंगळे, राधेश्याम अग्रवाल, निखील जैन उपस्थित होते. नानीबाई का मायरा कार्यक्रमा दरम्यान जयकिशोरी यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या विविध कथा सांगितल्या.
जयकिशोरी यांच्या मधुर वाणीतून कथा ऐकून उपस्थित भाविक सुध्दा भक्ती तल्लीन होवून नाचू व गाऊ लागले. त्यामुळे कार्यक्रम स्थळी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.तर प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांनी सुध्दा या भक्तीमय वातावरणात समरस होवून उपस्थितांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमाच्या पूर्वी वर्षा पटेल यांनी मायरा भरण्यासाठी पोहचल्या. या वेळी त्यांनी राधा स्वरुपा जयाकिशोरी यांना मोत्यांचा हार, नथनी, बाजूबंद, आणि विविध रत्नजडीत दागिने लावून जयकिशोरी यांचा श्रृंगार केला. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा वाजवून उत्साह वाढविला. या वेळी प्रफुल्ल पटेल यांनी नानीबाई का मायरा कार्यक्रमा दरम्यान कथांचे वाचन करुन तीन दिवस भक्तीमय वातावरण निर्माण केल्याबद्दल जयाकिशोरी यांचे आभार मानले.
या वेळी गोपालनाथजी महाराज यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आशीर्वाद दिले. नानीबाई का मायरा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या मनोहरभाई पटेल अॅकडमी व गोंदिया शिक्षण संस्थेच्या कर्मचाºयांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
विविध संस्थाचे आभार
मनोहरभाई पटेल अॅकडमीच्या वतीने येथील सर्कस मैदानावर तीन दिवस आयोजित नानीबाई का मायरा या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध संस्थांनी सहकार्य केले. याबद्दल अॅकडमीचे संरक्षक प्रफुल्ल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन यांनी मारवाडी युवक मंडळ, मारवाडी महिला मंडळ, चौरसीया समाज, सिंधी जनरल पंचायत, हरे माधव सत्संग समिती, बढते कदम, बाबा गुरुमुखदास सेवा समिती, सिंधी पंचायत महिला समिती, सख्खर पंचायत, सिंधू सेना, ब्राम्हण सेना, गुजराती राष्टÑीय केलवणी मंडळ, वामा सेवा समिती, यश समिती, मटका कोला समिती यासह विविध समित्यांचे आभार मानले.
भावनिक प्रसंग
नानीबाई का मायरा दरम्यान राधा स्वरुपा जयाकिशोरी यांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या कथेचे वाचन करीत होत्या. श्रीकृष्ण आणि राणी रुक्मणी यांनी स्वत: भक्त नरसिंह महाराज यांची मुलगी नानी च्या विवाहात मायरा भरण्यासाठी पोहचल्याच्या कथेचा सार सांगितला. या दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल या ओढणी व मायरा घेवून कार्यक्रम स्थळी मंचावर पोहचले. या भावनिक प्रसंगाने कार्यक्रमास्थळी काही क्षण भावनिक वातावरण निर्माण झाले होते.