जिल्हा नियोजनाचे प्रस्ताव १५ दिवसात सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:08 AM2018-08-18T00:08:25+5:302018-08-18T00:10:20+5:30
जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यासाठी निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव पंधरा दिवसात नियोजन विभागाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपायुक्त नियोजन फिरके, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत सन २०१७-१८ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिन्ही योजना मिळून २५७ कोटी १९ लाख ८८ हजार नियतव्यय मंजूर होता. त्यापैकी २५४ कोटी १७ लाख ३ हजार एवढा खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ९८.८२ एवढी आहे. पालकमंत्री म्हणाले, यंत्रणांनी निधी मागणीसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. प्रस्ताव हे परिपूर्ण असावेत असेही त्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरु स्ती, वर्ग खोल्यांची दुरु स्ती, शाळांची आवार भिंत, तालुका क्र ीडा संकुलाचा वीज पुरवठा आदी विषय सदस्यांनी उपस्थित केले असता हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना बडोले यांनी दिल्या. जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांना नुकसान झाल्यामुळे सन२०१८-१८ ची लीज कॅरी फॉरवर्ड करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. त्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालक मंत्र्यांनी दिल्या. आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामासाठी ३.५० कोटी रुपये तर अंगणवाडी बांधकाम या योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुका क्र ीडा संकुल गोरेगाव येथील निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. गोंदिया शहरातील तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव नगर पालिकेने पाठवावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरातील अतिक्र मण व शहर विकास आराखडा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मलेरिया निर्मूलनासाठी ग्रामपंचायतनी काय उपाययोजना केल्या याबाबत माहिती सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, पट्टे वाटप, धान्य वाटप, मामा तलाव दुरु स्ती आदी योजनांचा जिल्हाधिकारी यांनी विशेष आढावा घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सर्व सदस्य व अधिकाऱ्यांंनी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
सडक अर्जुनी येथे सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण
सडक अर्जुनी येथे सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येणार आहे. यासाठी क्र ीडा विभागाने नियोजन करावे. प्रशिक्षण केंद्रासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी क्रीडा विभागाने युध्दपातळीवर कामाला लागण्याचे निर्देश दिले.
सिकलसेल मेळावा
जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती कार्यक्र म व्यापक स्वरूपात राबविण्यात यावा.यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रिक्त पदे त्वरीत भरा
जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकाच अधिकाºयाकडे दोन ते तीन विभागाचा प्रभार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. तर नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना एकाच कामासाठी वांरवार चकरा मारव्या लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध विभागात रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.