अडकू शकते अध्यक्षांची निवड
By admin | Published: August 20, 2014 11:37 PM2014-08-20T23:37:32+5:302014-08-20T23:37:32+5:30
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड ग्रामसभेतून निवडण्याचे निर्देश शासनाने दिले. १५ ते ३० आॅगस्टदरम्यान तंटामुक्त अध्यक्षांची निवड करण्याची तारीख आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या
तंटामुक्त मोहीम : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका
गोंदिया : तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड ग्रामसभेतून निवडण्याचे निर्देश शासनाने दिले. १५ ते ३० आॅगस्टदरम्यान तंटामुक्त अध्यक्षांची निवड करण्याची तारीख आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २६ आॅगस्ट ला आचारसंहिता लागणार असल्याने तंटामुक्त अध्यक्षाची निवड अडकण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व गावांतील तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी लगबग सुरू आहे.
गावात शांततेची गंगा नांदावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त मोहीम अमंलात आणली. मोहीमेची अमंलबजावणी करण्यासाठी गावात एक समिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. समितीत एक अध्यक्ष राहील. त्या अध्यक्षपदी गावातील जेष्ट नागरिक, सन्मानजनक व्यक्ती, राजकारणापासून अलिप्त व कायद्याची जाण असलेल्या व्यक्तीची निवड करण्याचे सूचविण्यात आले. परंतु तंटामुक्त अध्यक्षाला गावात सन्मानाचे पद मिळत असल्याने अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू झाली. परिणामी राजकारण्यांचा या मोहमेत शिरकाव झाला. मानसन्मान मिळत असल्याने गुन्हेगार व्यक्तीही या मोहीमेवर येऊ लागले. परिणामी तंटामुक्त मोहीमेवर गुन्हेगार येणार नाहीत यासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना अध्यक्षपदासाठी चारित्र्य प्रमाणपत्राची अट घातली. अध्यक्ष निवडतांना अध्यक्ष ग्रामसभेतून निवडावा, अध्यक्षाचा कार्यकाल एक वर्षाचा राहील असा निर्णय शासनाने काढला. अध्यक्ष निवडीचा कालावधी १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान ठरविण्यात आला. यानुसार दरवर्षी अध्यक्षाची निवड करण्यात आली. तंटामुक्त अध्यक्ष आपले पद सोडायला तयार नाही. निवडीसाठी वेळ वाया घालविण्याचा प्रकार ते करीत आहेत. या दरम्यान आचार संहिता लागू झाल्यास आपल्याला एक वर्षाचा कालवधी मिळेल असे ते गृहीत धरून तंटामुक्त समितीत नविन अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभा होऊ नये यासाठी वर्तमानचे अनेक अध्यक्ष प्रयत्न करीत आहेत. आचारसंहितेपूर्वी अध्यक्षाची निवड होणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)