साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य विभाग झाला सज्ज

By admin | Published: July 5, 2015 02:08 AM2015-07-05T02:08:00+5:302015-07-05T02:08:00+5:30

पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यात साथरोग पसरते. साथरोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

To prevent the outbreak of epidemics, the Health Department is ready | साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य विभाग झाला सज्ज

साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य विभाग झाला सज्ज

Next

गोंदिया : पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यात साथरोग पसरते. साथरोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. या साथरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० हजार मेडीक्लोर मागविण्यात आल्या आहेत. साथरोगाच्या उपयोगात येणाऱ्या २१ प्रकारच्या १५० औषधीचा साठा प्रत्येक उपकेंद्रात उपलब्ध करण्यात आला आहे.
पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार होत असतात. डायरीया, डिसेंट्री, काविळ, टायफाईड, गेस्ट्रो व कॉलरा असे आजार होत असतात. या आजरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. रूग्णांना सेवा देण्यासाठी २४ तास रूग्णवाहीकेची सोय, २४ तास फोन सेवा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष, उपचाराला त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी शिघ्र प्रतिसाद पथक (रेपीड रिस्पॉन्स टीम) नेमन्यात आले आहे.
पावसाळ्यात सर्वात जास्त पाण्यामुळे आजार उदभवत असल्यामुळे जलसुरक्षा करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेण्यात आली आहे.
ग्राम पंचायतींंनी ब्लिचींग पावडरची सोय पुरेपूर करून ठेवाव्यात अश्या सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्फत खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या साथरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागबाईल युनिट, जिल्हा भरारी पथक तयार केले आहे.
पाण्याचे नमुने तपासणे, दूषित पाण्याच्या नमुन्यांची माहिती संबधितांना देणे, पाण्याच्या तपासणीनंतर त्यांना लाल, हिरवा, पिवळा असे कार्ड देणे, बंद पडलेली, तुटलेली गटारे वाहती करणे, नळगळत्या व्हाल्ॅव्हगळत्या, नळ दुरूस्त करणे, परिसर स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ ग्राम पंचायतीनंचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ३२१ ग्रा पंचायतींना हिरवे कार्ड, २३४ गावांना पिवळे कार्ड तर गोरेगाव तालुक्याच्या पुरगाव ग्राम पंचायतीला लाल कार्ड देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
फवारणीसाठी १२ चमू
हिवतापाला आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ४२६ गावाची निवड करण्यात आली आहे. आदिवासी भागातील या गावात फवारणीचा पहिला टप्पा १ जून तग १२ आॅगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ४२६ गावात तीन लाख १६ हजार ५६३ लोक राहात आहेत. एका चमूत सहा माणसे मिळून १२ चमूत ७२ फवारणी कामगार लावण्यात आले आहे. उर्वरीत सात असे एकूण ७९ कर्मचारी फवारणीसाठी आहेत.
मच्छरदाण्या १० वर्षापासून नाहीत
आदिवासी जनतेला डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्या देण्याचा शासनाचा उपक्रम होता. मात्र सन २००५ पासून शासनाने आदिवासी जनतेला मच्छरदाण्या पुरविल्या नाहीत. यावर्षी पुन्हा या मच्छरदाण्या मिळण्याची आशा हिवताप नियंत्रण विभागाला आहे.

Web Title: To prevent the outbreak of epidemics, the Health Department is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.