उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:13+5:302021-07-15T04:21:13+5:30
बाराभाटी : मानवाच्या सुरक्षेसाठी विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, आपण सर्व सुरक्षित राहू यासाठी प्रतिबंधात्मक लस प्रत्येकाने घेतलीच पाहिजे, ...
बाराभाटी : मानवाच्या सुरक्षेसाठी विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, आपण सर्व सुरक्षित राहू यासाठी प्रतिबंधात्मक लस प्रत्येकाने घेतलीच पाहिजे, असे प्रतिपादन अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्राचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभेदार खोब्रागडे, डॉ. दिनेश बारसागडे व कर्मचारी उपस्थित होते. निमोनिया बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याने मेनींजायटीस, सेफ्टी सेमिया आणि न्यूमोनियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच सायनुसायटिससारखे सौम्य आजारही होऊ शकतात. यावर प्रतिबंधात्मक म्हणून ही लस बालकांना सहा आठवडे चौदा आठवडे आणि बुस्टर डोस नवव्या महिन्यात देण्यात येणार आहे.