राज्यपालांच्या हस्ते रहांगडालेचा यांचा गौरव
By admin | Published: August 15, 2016 12:33 AM2016-08-15T00:33:22+5:302016-08-15T00:33:22+5:30
बोंडगावदेवी : नागपुर वनवृत्ता अंतर्गत गोंदिया वन विभागातील अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल छगनलाल रहांगडाले यांचा
बोंडगावदेवी : नागपुर वनवृत्ता अंतर्गत गोंदिया वन विभागातील अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल छगनलाल रहांगडाले यांचा वन, वन्यजीव व्यवस्थापन कार्यात बहुमोल कामगीरी केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला.
सन २०१४-१५ वर्षासाठी राज्यस्तरावर वन, वन्यजीव व्यवस्थापन कार्यक्रमात भरीव योगदान देऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनक्षेत्रपाल या संवर्गातून पुणे येथील यशदाच्या सभागृहात आयोजित समारंभात राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते सुवर्ण पदक, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी वनराज्यमंत्री राजे अम्बरीश आत्राम, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान वनसंरक्षक सर्जन भगत उपस्थित होते. संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम, मित्र रोपवनास राज्यस्तरीय द्वितीय, तृतीय पुरस्कार मडेघाट, धाबेटेकडी, तिडका या गावांना पुरस्कार मिळविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कौतुक गोंदियाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, परिविक्षाधिन सीडीएफ राहुल पाटील, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी.उदापुरे यांनी केले आहे. (वार्ताहर)