प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:07 PM2017-09-25T22:07:47+5:302017-09-25T22:08:00+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित वैद्यकीय अधिकारी नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे रूग्णाची गैरसोय होत आहे. येथील रूग्णसेवा कोलमडली असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर असल्याचे चित्र आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रेंगेपार, पांढरी, हलबीटोला, गोंगले, मुरपार, बकीटोला, भोयरटोला, डुंडा, घटेगाव, मालीजुंगा, सितेपार, शिवनटोला आदी गावांतील रुग्ण औषधोपचारासाठी येतात. परंतु येथील शासकीय वैद्यकीय अधिकाºयांची बदली झाली. त्याच्या जागेवर दुसºया वैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती न झाल्याने रूग्णांवर योग्य उपचार होत नाही. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. रूग्णसंख्या वाढली आहे. आपल्या व कुटुंबाच्या उपचारासाठी येथील आरोग्य केंद्रात रोजच रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. परंतु येथील सर्व कारभार रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
या ठिकाणी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आले आहेत. तर दुसरे ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणारे डॉक्टर आहेत. परंतु सध्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया डॉक्टरांचा ११ महिन्यांचा कालावधी संपला आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रामध्ये शासकीय डॉक्टरांचे पद रिक्त आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाºयांनी त्वरित या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता, पांढरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. ब्राम्हणकर या वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. परंतु ते सध्या तहसील कार्यालय सडक-अर्जुनी येथील आरोग्य केंद्रामध्ये ठाण मांडून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पूर्वीपासूनच शासकीय अधिकारी व कर्मचाºयांची कमतरता आहे. शिवाय सद्यस्थितीत परिसरातील गावांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढला आहे. सदर केंद्रात औषधोपचार मिळत नसल्याने रूग्ण खासगी व बोगस डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.