मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:38 AM2021-02-27T04:38:42+5:302021-02-27T04:38:42+5:30
आमगाव : कास्ट्राईब शिक्षक संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने आमगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांचा संविधान ...
आमगाव : कास्ट्राईब शिक्षक संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने आमगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांचा संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष अनिल मेश्राम यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी मेश्राम यांनी मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी येटरे, गटसमन्वयक सुनील बोपचे, विषय साधनव्यक्ती वशिष्ट खोब्रागडे, कटरे उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनातून शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव जि.प.ला अविलंब पाठविण्यात यावे, १ नोव्हेंबर २००५ पासून आतापर्यंत झालेल्या डी.सी.पी.एस. योजनेतील खात्याचे विवरण आर थ्री वार्षिक पद्धतीने घेण्यात यावे, जी.पी.एफ व डी.सी.पी.एस.हप्त्याची नोंद करून पावती देण्यात यावी. शिक्षकांना उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी अर्ज व कार्योत्तर परवानगी अर्ज जि.प. गोंदिया येथे अविलंब पाठविण्यात यावे. शिक्षकांचे थकीत वैद्यकीय व अर्जीत रजेचे बिल त्वरित काढण्यात यावे. दरवर्षी गोपनीय अहवालाची एक प्रत शिक्षकांना देण्यात यावी. पगार बिलामध्ये डी.सी.पी.एस. कपातीचे शेड्यूल्ड लावण्यात यावे. भारताचे संविधान उद्देशिका छायांकित फोटो प्रत्येक शाळेच्या कार्यालयात लावण्यात यावे. शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतने भरणे. शिक्षकांचे दुय्यम सेवा पुस्तक अद्ययावत करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संजय उके, तालुकाध्यक्ष अनिल मेश्राम, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगोडे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष भरत वाघमारे, तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष रमण हुमे, सरचिटणीस धनंजय रामटेके, मुख्य संघटन सचिव नरेंद्र हुमणे, उपाध्यक्ष सोमकांत भालेकर, कोषाध्यक्ष रवींद्र खापर्डे, उपाध्यक्ष एल.जी.बारई, कार्यालयीन सचिव दिनेश डोंगरे, जिल्हा संघटक विनोद रंगारी, संघटक सुरज मडावी, संघटक आर.एम.करंडे, पी.एच.गिर्हेपुंजे व लिपिक टी.के.धोटे यांचा समावेश होता.