शिक्षकांच्या वेतनास विलंबाची समस्या झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:00 AM2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:12+5:30

गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शिक्षकांची मागील अनेक दिवसांपासून ओरड सुरू आहे. त्यामुळे शिक्षक सहकार संघटनेने खा. प्रफुल्ल पटेल, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती.खा.पटेल यांनी याची दखल घेत शिक्षण मंत्री आणि वित्त विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा केली.

The problem of delay in teacher's salary has gone away | शिक्षकांच्या वेतनास विलंबाची समस्या झाली दूर

शिक्षकांच्या वेतनास विलंबाची समस्या झाली दूर

Next
ठळक मुद्देहजारो शिक्षकांना दिलासा : आर्थिक भुर्दंड भसणार नाही, वेळत जमा होणार खात्यात वेतन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन एकाच बँकेत स्टेट बँक आॅफ इंडिया येथे असल्यास, सीएमपी प्रणाली अंतर्गत कोषागारातून बिल मंजूर होताच सर्व शिक्षकांच्या खात्यात दोन ते चार तासात त्याच दिवशी पगार जमा होणार आहे. कोषागारातून ते शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी त्यानंतर बँक, बँकेतून मुख्याध्यापक यांच्या खात्यावरून शिक्षक असा जो पाच सहा दिवसांचा कालावधी लागत होता मात्र आता तो लागणार नसून चार ते पाच तासात सीएमपी मंजूर होताच त्याच दिवशी शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शिक्षकांची मागील अनेक दिवसांपासून ओरड सुरू आहे. त्यामुळे शिक्षक सहकार संघटनेने खा. प्रफुल्ल पटेल, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती.खा.पटेल यांनी याची दखल घेत शिक्षण मंत्री आणि वित्त विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता शिक्षकांचे वेतन वेळेवर होणार असून वेतनाची रक्कम सुध्दा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जि.प.प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हिवारे यांनी पत्र काढून थेट वित्त विभागातून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मदतीने थेट शिक्षकांच्या खात्यामध्ये वेतन जमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे स्टेट बँकेत खाते असलेल्या जिल्ह्यातील ३५०० वर शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. जि.प.अंतर्गत ३५०० वर शिक्षक कार्यरत आहे. मात्र दर महिन्याला शिक्षकांचे वेतन वेळवर होत नसल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शिक्षक सहकार संघटनेने खा. प्रफुल्ल पटेल यांची भेट घेवून ही समस्या मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले होते. त्यांनी याची दखल घेत या विषयावर शिक्षण आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ज्याप्रमाणे भंडारा, जालना आणि ठाणे जि.प.शिक्षकांचे वेतन ज्या सीएमपी प्रणालीव्दारे काढले जाते. त्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन काढण्यास सांगितले. त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्याशी सुध्दा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. स्थानिक पातळीवर सीएमपी व आरटीजीएस प्रणाली लागू करुन वेळेवर वेतन करण्याची मागणी केली होती.
नुकतेच रूजू झालेले सीईओ प्रदीपकुमार डांगे यांच्याशी सुध्दा चर्चा केली होती. शिक्षणाधिकारी हिवारे यांनी भंडारा शिक्षण विभागाकडून माहिती घेवून त्याच धर्तीवर गोंदिया जि.प.मध्ये शिक्षकांचे वेतन जमा करण्यासंदर्भात प्रणाली अवलंब करण्यास सांगितले. याबाबत ६ आॅक्टोबरला पत्र काढून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन आता वेळवर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भुर्दंड बसणार नाही
दर महिन्याला शिक्षकांचे पगार १० ते १५ दिवस उशीरा होत असल्याने शिक्षकांना गृहकर्ज हप्ता अथवा इतर कर्जाचे हप्ते भरण्यास विलंब होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र खा.प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेवर व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकाºयांनी केलेल्या उपाययोजनेमुळे आता शिक्षकांचे वेतन वेळेत होणार आहे. याबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Web Title: The problem of delay in teacher's salary has gone away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.