शहरात वाढतेय प्रदूषणाची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 09:56 PM2019-06-04T21:56:26+5:302019-06-04T21:57:16+5:30
पावसाळा गोंदिया जिल्हावासीयांसाठी तापदायकच ठरतो़ पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावसाळ्यात नगर परिषदेकडून पावसाळा पूर्वीची कामे करणे जोमाने सुरू आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा गोंदिया शहरवासीयांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी ग्वाही नगरपरिषद देत आहे.
जागतिक पर्यावरण दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पावसाळा गोंदिया जिल्हावासीयांसाठी तापदायकच ठरतो़ पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावसाळ्यात नगर परिषदेकडून पावसाळा पूर्वीची कामे करणे जोमाने सुरू आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा गोंदिया शहरवासीयांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी ग्वाही नगरपरिषद देत आहे. परंतु येत्या काही दिवसांतच पावसाळा सुरू होत असल्याने चित्र स्पष्ट होईल़
पावसाळ्याला घेऊन गोंदिया नगर परिषदेतर्फे नियोजन करण्यात आले. ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मान्सून पूर्व तयारी केली जाते. परंतु दरवर्षी कितीही तयार केली जात असली तरी पहिल्या पावसातच नगर परिषदेची पोलखोल होते. गोंदियातील रस्त्यांवर असलेले व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हा मुद्दा देखील गोंदिया शहराच्या विकास कामांना अडथळा घालणारा असतो. गोंदियाच्या बाजार परिसरातील नाल्यांमध्ये व्यापारी वर्गाकडून प्लास्टीक टाकण्यात येत असल्यामुळे नाल्यांमध्ये गाळ साचून राहतो. दुकानासमोरील नाल्यांवर सिमेंट कॉँक्रीटचे झाकण व्यापाऱ्यांनी बसविल्यामुळे त्या ठिकाणच्या नालीतील घाण नगर परिषदेला काढता येत नाही. नगर परिषदेने नाल्या स्वच्छ करण्याचा माणस जरी लावल्याचे दाखविले तर त्या काळापूरता आपला व्यवसाय बुडेल हे गृहीत धरून व्यापारी वर्ग आपल्या संबधीत लोकप्रतिनिधींना बोलतात. ते लोकप्रतिनिधी व्यापाºयांच्या सोयीसाठी नाल्यास्वच्छतेकडे दुर्लक्ष करा असा अलिखीत फतवा काढतात. नगर परिषदेच्या हद्दीत लाखोची वाहने आहेत. परंतु या वाहनांतून निघणाºया धुरावर आळा घालण्यासाठी नगर परिषदेने वृक्षारोपणाची योजना राबविली नाही. रस्त्याच्या बाजूला झाडे लावली नाही. गोंदिया शहर हिरवेगार दिसण्याऐवजी सिमेंट कांक्रीटचे जंगल दिसत आहे. वाहनांमधून बाहेर पडणाºया धूरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गोंदियातील घाणीच्या साम्राज्यामुळे अनेक ठिकाणचे जलस्त्रोत दूषित आहेत.
प्रशासन काय उपाय करतेय?
पावसाळा म्हटला की गोंदिया शहरवासीयांना नाकीनऊ आणणारा काळच ठरतो. तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवर साचलेले पाणी व जागोजागी चिखल अशात शहरवासीयांना हा काळ घालवावा लागतो. त्यामुळे पावसाळा एकप्रकारे शहरवासीयांना नकोसाच होतो. यंदा मात्र शहरवासीयांना पावसाळा जास्त त्रासदायक ठरू नये यादृष्टीने नगर परिषद यावर तोडगा म्हणून काही उपाय करीत आहे. यंदाच्या पावसाळ््यात पावसाचे पाणी नाल्यांत तुंबू नये यासाठी मान्सून पूर्व सफाई अभियानातून मोठे नाले व अंतर्गत लहान नाल्यांची सफाई केली जात आहे. जेसीबी व पोकलॅन मशीनसह मजुरांची एक टीमच नाली सफाईच्या कामासाठी लावण्यात आली आहे. रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यंदा नगर परिषदेने शहरातील विविध प्रभागांत सुमारे २२ कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे शहरातील पूर्वी सारखी असलेली स्थिती यंदा निर्माण होणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. तरिही काही भागात पावसाच्या पाण्यामुळे काही त्रास उद्भवल्यास नगर परिषद प्रशासन त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्पर आहे. स्वच्छता विभागाला याबाबत तसे निर्देश देण्यात आले असून नगराध्यक्ष, पदाधिकारी व मुख्याधिकारी नजर ठेवून राहतील.
४७०० वृक्ष लागवडीचे टार्गेट
पावसाळ्यातील आपात्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मान्सूनपूर्व काळात घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.
नगर परिषदेने पावसाळा बघता मान्सून पूर्व सफाई अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. यांतर्गत शहरातील मोठे नाले जेसीबी व पोकलॅन मशीन लावून सफाई केली जात आहे.
याशिवाय मॉन्सून पूर्व सफाई अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर माणसे घेवून शहरातील अंतर्गत नाल्यांची सफाई करविली जात आहे. जेणेकरून पावसाचे पाणी शहरात साचून राहू नये.
वाढते तापमान बघता यावर तोडगा म्हणून राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नगर परिषद हातभार लावत असून शहारात वृक्ष लागवड केली जाणार आहे.
यंदा नगर परिषदेला चार हजार ७०० रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, नगर परिषद नियोजन करीत आहे.