बेरोजगारांची समस्या शासन दरबारी मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:48+5:302021-01-18T04:26:48+5:30
आमगाव : विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी, पेन्शन योजना लागू करण्यासाठी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. ग्रामीण भागातील शाळेत ...
आमगाव : विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी, पेन्शन योजना लागू करण्यासाठी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. ग्रामीण भागातील शाळेत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार. क्रीडा संकुल उभारण्यासाठी, वाचनालयांना अनुदान मिळेल याकरिता पाठपुरावा केला जाणार. जिल्ह्यातील बेरोजगारांची समस्या शासन दरबारी मांडणार, असे प्रतिपादन नागपूर पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी यांनी केले.
स्वामी विवेकानंद संकुल परिसरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शिक्षक संघ व ॲड. अभिजित वंजारी मित्रपरिवारच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. एन.डी. किरसान, भंडारा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, नागपूर विभाग शिवसेना संघटक किरण पांडव उपस्थित होते. याप्रसंगी संयोजक राजेश गोयल यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आमदार वंजारी यांचा सत्कार केला. तर आमगाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष इसुलाल भालेकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राधाकिसन चुटे, राजीव फुंडे, नरेंद्र कावळे, रितेश अग्रवाल, मुरलीधर करंडे, रेखलाल टेंंभरे, विकास शर्मा, महेश मेश्राम उपस्थित होते.