मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:35+5:302021-09-04T04:34:35+5:30
गोंदिया : मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यात यावे, यासाठी कास्ट्राइब शिक्षक संघटना जिल्हा ...
गोंदिया : मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यात यावे, यासाठी कास्ट्राइब शिक्षक संघटना जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष तथा कास्ट्राइब कर्मचारी महासंघ जिल्हा गोंदियाचे अति.सरचिटणीस संजय उके यांच्या नेतृत्वात गोरेगावचे गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांच्यासह झालेल्या बैठकीत समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्या सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन बीडीओ यांनी दिले. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी नीलकंठ शिरसाटे उपस्थित होते.
आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचारी, अधिकारी यांचे आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव अविलंब जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविणे, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, अधिकारी यांच्या सेवा पुस्तिका सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविणे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन विक्री अंश राशीकरण राशी, गटविमा, उपदान रजा रोखीकरण राशी मिळणे, पेन्शन अदालत आयोजित करणे, सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता, उच्च परीक्षेला बसण्याचे व परीक्षा पास झाल्याचे कार्योत्तर परवानगी अर्ज, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, सेवानिवृत्ती फाइल्स तातडीने जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावी, सेवानिवृत्त अंगणवाडीसेविका व मदतनीस यांचे प्रलंबित एकरकमी पेन्शन प्रस्ताव मंजूर करणे, अशा विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे उपाध्यक्ष भरत वाघमारे, सिद्धार्थ भोतमांगे, महासंघाचे तालुकाध्यक्ष नम्रता रंगारी, तालुकाध्यक्ष अजित रामटेके, राजेश गजभिये, हेमराज शहारे, मुकेश अंबादे, दिनेश अंबादे, संजू शहारे, रीना शहारे, कविता बागडे, सविता पाटील, लक्ष्मी राऊत, राजेश खांडेकर, मिलिंद नंदागवळी, राजेश रामटेके, वृषाली बंसोड उपस्थित होते.