प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:32 PM2018-07-21T22:32:57+5:302018-07-21T22:34:07+5:30

महाराष्ट्र शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांना बुधवारी (दि.१८) देण्यात आले. या वेळी आमदार गाणार व महासंघाचे पदाधिकारी यांच्यात प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा झाली.

The problems of laboratory employees will be resolved | प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार

प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार

Next
ठळक मुद्देगाणार यांची दिले आश्वासन : महासंघाच्या पदाधिकाºयांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : महाराष्ट्र शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांना बुधवारी (दि.१८) देण्यात आले. या वेळी आमदार गाणार व महासंघाचे पदाधिकारी यांच्यात प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा झाली. दरम्यान प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन गाणार यांनी दिले.
शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गोपीचंद कुकडे व गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र भड यांच्या नेतृत्वात शिक्षक आमदार गाणार यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद भैसारे, आत्राम, होले, संस्थाध्यक्ष व प्रयोगशाळा सहायक चरणदास उंदिरवाडे, संस्थाध्यक्ष राष्ट्रपाल वैद्य, राजेंद्र बडोले, एकनाथ बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
निवेदनात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रयोगशाळा सहायक व एल.ए.चा मुख्य मुद्दा चौथ्या वेतन आयोगापासून केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी न देता मोठी तफावत करण्यात आली. ती वेतनश्रेणी केंद्राप्रमाणे करुन सातवा वेतन आयोग केंद्राप्रमाणे जशाच्या तसा लागू करावा व वेतनातील फरक काढावा. सातव्या वेतन आयोगाच्या बक्षी समितीने वेतन त्रुटी सुधारण्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा बोलाविणे आवश्यक असताना एकाही संघटनेला न बोलाविल्यामुळे संघटना राज्य शासनावर नाराज आहे. त्यामुळे सदर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांच्यासोबत बैठक लावण्यात यावी.
आश्वासित सेवा प्रगती योजना रद्द करुन वरिष्ठ श्रेणी व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ पूर्वीप्रमाणेच देण्यात यावा. अशा प्रलंबित व अन्यायकारक समस्या व मागण्यांचे निवेदन देऊन सातवा वेतन आयोग लावण्यापूर्वी महासंघाच्या मागण्या मान्य कराव्या व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून, शिक्षक आ. गाणार यांनी शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव, बक्षी समितीला शासकीय बैठक त्वरित लावण्यासाठी पत्र लिहून पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे सांगितले. तसेच वेतनाचा गंभीर प्रश्न व इतरही प्रश्नांवर चर्चा करुन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास उग्र आंदोलन छेडणार-जगताप
महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भरत जगताप यांनी दिवाळीपूर्वी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करु या अर्थमंत्र्यांच्या घोषणेवर आक्षेप घेताना म्हटले की, राज्य शासन व बक्षी समितीने कर्मचारी संघांना वेतन त्रुटी दूर करण्यासाठी शासकीय बैठका न लावता सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा फसवणी आहे. प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना शासन नियुक्त समन्वय समितीने सुचविलेल्या सुधारित शिक्षकेतर कर्मचारी बंद भरती त्वरित उठवावी व त्वरित भरती करावी. तसेच शासकीय बैठकीत महासंघाने सुचविलेल्या मागण्या मान्य करुन केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू न केल्यास राज्यभरातील हजारो कर्मचारी हिवाळी अधिवेशन व आझाद मैदानावर उग्र आंदोलन छेडणार. वेळ पडल्यास आमरण उपोषण करणार असा तिव्र इशारा राज्याध्यक्ष जगताप दिला.

Web Title: The problems of laboratory employees will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.