वाहनांच्या पार्किंगची समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:46 PM2018-05-09T21:46:44+5:302018-05-09T21:46:44+5:30

बाजार भागातील वाहनांच्या पार्कींगची सर्वाधिक डोकेदुखीची समस्या लवकरच सुटण्याचे संकेत आहेत.‘पार्कींग प्लाजा’च्या मार्गातील अडचणी दूर झाल्या असून लवकरच बांधकामाला सुरूवात होणार आहे.

Problems with parking of vehicles | वाहनांच्या पार्किंगची समस्या सुटणार

वाहनांच्या पार्किंगची समस्या सुटणार

Next
ठळक मुद्दे‘पार्कींग प्लाजा’चे काम लवकरच : पाच कोटींचा निधी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाजार भागातील वाहनांच्या पार्कींगची सर्वाधिक डोकेदुखीची समस्या लवकरच सुटण्याचे संकेत आहेत.‘पार्कींग प्लाजा’च्या मार्गातील अडचणी दूर झाल्या असून लवकरच बांधकामाला सुरूवात होणार आहे. बाजार भागातील ट्राफीक जामच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शहरातील वाहनांच्या संख्येपुढे रस्ते अरूंद होऊ लागले आहेत. परिणामी बाजार भागात पावलापावलांवर नागरिकांना ट्राफीक जामचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची ही आजची सर्वात जास्त डोकेदुखीची समस्या बनली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस ठाण्याच्या मागील क्वार्टर्सच्या जागेवर पार्कींगची व्यवस्था करण्याचे ठरविले होते. यासाठी त्यांनी माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडून क्वार्टर्सची १८ हजार स्क्वे.फुट जागा नगर परिषदेला नि:शुल्क हस्तांतरीत करवून दिली होती. शिवाय सुमारे ५.५० कोटींच्या या ‘पार्कींग प्लाजा’साठी अगोदर दोन कोटी रूपये मंजूर करवून घेतले. त्यावर अता २५ लाख रूपये व्याज मिळाले असून त्यानंतर तीन कोटी रूपये मंजूर करविण्यात आले आहेत.मात्र क्वार्टर्समधील काही रहिवासी तसेच ‘पार्कींग प्लाजा’च्या मधात रस्ता सोडण्याचा प्रश्न कायम असल्याने बांधकामाची सुरूवात खोळंबत होती. यावर कायम तोडगा काढण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ व अन्य संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी क्वार्टर्समधील रहिवासी क्वार्टर्स समोर जास्त जागा सोडून तेवढी जागा एचडीएफसी बॅँक व अग्रसेन भवन मार्गावर वाढविण्याची मागणी करीत असल्याचे सांगीतले.
यावर बांधकाम समिती सभापती शकील मंसूरी यांनी, शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असून त्यात एचडीएफसी बॅँक-अग्रसेन भवन रस्ता रूंद करण्याची गरज असताना त्याला अधीक अरूंद करणे संभम नसल्याचे सांगीतले. तर या समस्येवर आमदार अग्रवाल व पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले.
अखेर आमदार अग्रवाल यांनी ४-५ पोलीस क्वार्टर्ससाठी आवश्यक तेवढा रस्ता सोडून येथून फक्त पोलीस क्वार्टर्ससाठीच ये-जा असल्याचे सांगितले. यावर पोलीस अधीक्षक भुजबळ व आमदार अग्रवाल यांच्या सर्वसंमतीने ५ मीटरचा रस्ता व सांडपाण्याच्या वाहून जाण्यासाठी एका नाली एवढी जागा सोडून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आता ‘पार्कींग प्लाजा’चे बांधकाम पूर्ण गतीने होणार आहे. बैठकीला आरेखक कुकडे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगर रचना विभागाचे सलाम, प्रदीप द्विवेदी, युवक कॉँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, शहर पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे उपस्थित होते.
तीन माळ््यांचा ‘पार्कींग प्लाजा’
नागपूर येथील ‘पार्कींग प्लाजा’ तयार करणारे आर्कीटेक्ट कुकडे यांनी येथील ‘पार्कींग प्लाजा’चा नकाशा व बजेट तयार केला आहे. या ‘पार्कींग प्लाजा’मध्ये भूतळात (बेसमेंट) मोटारसायकल पार्कींग राहणारे आहे. तळमाळ््यावर (ग्राऊंड फ्लोर) कार पार्कींग राहणार असून पहिल्या माळ्यावर सायकल पार्कींगची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय दुसºया व तिसºया माळ््यावर सभागृह तयार करण्याची योजना आहे.

Web Title: Problems with parking of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.