आता सुटणार खड्डेमय रस्त्यांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:09 PM2018-07-21T22:09:51+5:302018-07-21T22:10:34+5:30

तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यावर ठोक तरतुदी अंतर्गत वित्तमंत्र्यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला.

Problems with paved road problems now | आता सुटणार खड्डेमय रस्त्यांची समस्या

आता सुटणार खड्डेमय रस्त्यांची समस्या

Next
ठळक मुद्देतिरोडा व गोरेगाव नगरातील रस्त्यांसाठी १५ कोटी : विजय रहांगडाले यांनी मानले वित्तमंत्र्यांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यावर ठोक तरतुदी अंतर्गत वित्तमंत्र्यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे आता सदर दोन्ही शहरांतील खड्डेमय रस्त्यांच्या कटकटीपासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे.
तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत हद्दीतील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले आहेत. ठिकठिकाणी गिट्टी निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. शिवाय आता पावसाचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. अशावेळी वाहन चालकांचे अपघात घडतात. रस्त्यांवर चिखल तयार होवून रहदारी बाधित होते. सदर दोन्ही शहरांच्या हद्दीत असणाऱ्या काही रस्त्यांवरून तर पायी चालणेसुद्धा कठिण होते. मग वाहन कसे चालवावे, अशी समस्या निर्माण होते. सदर खड्डेमय उखडलेल्या रस्त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिक अनेक दिवसांपासून या रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी शासन-प्रशासनाकडे करीत होते.
नेमकी हीच बाब हेरून आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे रस्ते दुरूस्तीसाठी निधीची मागणी केली.
यावर वित्तमंत्र्यांनी त्वरित ठोक तरतुदी अंतर्गत गोरेगाव नगर पंचायतकरिता १० कोटींचा निधी दिला. तसेच तिरोडा नगर परिषद क्षेत्रातील रस्ते दुरूस्तीकरिता ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून दोन्ही शहरांतील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येईल व नागरिकांना रहदारीयोग्य रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यामुळे तिरोडा शहर व गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रातील रस्त्यांच्या स्थितीमध्ये चांगला सुधार घडून येईल व नागरिकांच्या रहदारीची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, असे आ. रहांगडाले यांनी सांगितले. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आ. रहांगडाले यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

Web Title: Problems with paved road problems now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.