डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रि या सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:49 AM2018-12-02T00:49:47+5:302018-12-02T00:50:34+5:30

योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जातात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचे स्वप्न बघितले. नुसतं स्वप्नच बघितले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान राबविले.

Process Benefits of Digital India schemes | डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रि या सुलभ

डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रि या सुलभ

Next
ठळक मुद्देविनोद अग्रवाल : ग्राम निलज येथील कार्तिक यात्रेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जातात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचे स्वप्न बघितले. नुसतं स्वप्नच बघितले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान राबविले. यामुळे गावातील युवक-युवती डिजीटल साक्षर झाले असून विजेचे बिल असो वा मोबाईल रिचार्ज किंवा बॅँकेत पैसे भरणा असे कुणालाही रांगेत उभे रहावे लागत नाही. डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रीया सुलभ झाली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम निलज येथील विठ्ठल रूख्मीणी मंदिराच्या मैदानात आयोजित कार्तीक पौर्णिमा यात्रा व दुय्यम नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच संगीता रहांगडाले, भाऊलाल सिंगनधुपे, टेकचंदजी, सोमेश्वर पटले, एच.एन.गाते, मेश्राम, हेमंत तुरकर, जगतराय बिसेन, सोमेश्वर हरिणखेडे, अतुल तुरकर, रिखिलाल बिसेन, अविनाश जुगनहाके, भुमेश तुरकर, सुरेंद्र वासनिक, सुनिता तुरकर, लता कुसराम, उषा डहाट, सविता मेश्राम, रिना मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले, मंडई, मेला, उत्सव, नाटक, ड्रामा, दंडार या सगळ््या आपल्या पूर्वजांनी सुरु केलेल्या परंपरा आहेत. आधीच्या काळी जेव्हा करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे. मंडई, मेला, नाटक हे प्रबोधनाचे साधन झाले आणि देश जेव्हा स्वतंत्र नव्हता तेव्हा देशभक्तीपर नाटकांतून तेव्हाच्या तरु ण पिढीला एक नवी दिशा दाखवली आणि एक प्रकारे क्र ांतीचे साधन मंडई, मेला झाले. मंडई मुळे आपण सर्व एकत्र येतो व भेटतो. याने समाजाची बांधिलकी जपून राहते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: Process Benefits of Digital India schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :digitalडिजिटल