28 फेब्रु.पासून प्रक्रियेला होणार सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:13+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला 28 फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. यानंतर प्रारुप प्रभाग ...
Next
ref='https://www.lokmat.com/topics/zp/'>जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला 28 फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. यानंतर प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्याची प्रक्रिया 5 मार्चला, आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया 9 मार्चला, प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्दी करुन निवडणूक विभाग प्रभागानुसार आरक्षण जाहीर 13 मार्चला, जाहीर केलेल्या प्रभाग रचना आरक्षणावर आक्षेप हरकतीवर सूचना 16 ते 23 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. यानंतर यावर सुनावणी 3क् मार्चला घेऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षण 3 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आमगाव तालुक्यातील एक जिल्हा परिषद क्षेत्र कमी होण्याची शक्यता आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून यात लगतच्या आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या गावातील 29 हजार लोकसंख्येचा समावेश न.प.क्षेत्रत करण्यात आला.मात्र नगर परिषदेचा दर्जा देण्यावरून न्यायालयात वाद सुरू आहे.त्यामुळे या निर्णय आल्यावर काय होते पुढे ठरेल. मात्र नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यास आमगाव तालुक्यातील 1 जि.प.क्षेत्र कमी होण्याची तर गोंदिया तालुक्यात एक जि.प.क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.सध्या 17 हजार लोकसंख्येचे 1 जि.प.क्षेत्र आहे.त्यामुळे यात बदल झाल्यास सुध्दा बराच फरक पडण्याची शक्यता आहे. तिसरी आघाडी निवडणुकीच्या तयारीतजिल्ह्यातील विविध पक्षातील असंतुष्ठ पदाधिका:यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करुन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे.यासाठी त्यांच्या बैठका सुध्दा सुरू झाल्या आहेत. याला दोन दिवसांपूर्वीच माजी आ.दिलीप बन्सोड यांनी सुध्दा दुजोरा दिला होता. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे एकला चलो रे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अद्याप चार महिन्याचा कालवधी शिल्लक आहे.मात्र जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आत्तापासून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा सूर आवळला आहे. सभा बैठकांमधून तसा संदेश देखील पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना देऊन कामाला लागण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आघाडी होते पुन्हा स्वतंत्रपणो निवडणूक लढविली जाते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.