बांबू उद्योगासाठी बांबू क्लस्टरची निर्मिती लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:38 PM2018-09-06T21:38:48+5:302018-09-06T21:39:59+5:30

बांबू उद्योगाकरिता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लवकरच घेण्यात येणार आहे.

Production of bamboo cluster for bamboo industry soon | बांबू उद्योगासाठी बांबू क्लस्टरची निर्मिती लवकरच

बांबू उद्योगासाठी बांबू क्लस्टरची निर्मिती लवकरच

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप, नवेगावबांध संकुलासाठी निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : बांबू उद्योगाकरिता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लवकरच घेण्यात येणार आहे. बांबू क्लस्टर निर्मितीसाठी लवकरच आवश्यक उपाय योजना करण्यात येणार असल्याचे राजकुमार बडोले यांनी सांगितले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डात नवेगावबांध वनपरिक्षेत्रांतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने लाभार्थ्यांना गॅस वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक एस.युवराज, सरपंच तथा वनसमितीचे अध्यक्ष अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, विजय कापगते, तहसीलदार धनंजय देशमुख, वनपरिक्षेत्राधिकारी खान, सह वनपरिक्षेत्राधिकारी तथा समिती सचिव डी.एस. सोनवाने, केवळराम पुस्तोडे, खुशाल काशिवार, महादेव बोरकर, रामदास कोहाडकर, संजय उजवने, रितेश जायस्वाल, रेशीम वनशिवार, मुलचंद गुप्ता, पं.स.सदस्य गुलाब कोरेटी, विजय अरोरा, विशाखा साखरे उपस्थित होते. बडोले म्हणाले, गॅस वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून मंजूर झालेले ४ कोटी ९९ लाख रुपयांची कामे नवेगावबांध पर्यटन विकासासाठी तातडीने सुरु करण्यात येतील. गावाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी देवून नवेगावबांधचा विकास करण्यात येईल, अशी घोषणाही या वेळी केली. नवेगावबांध संयुक्त वन व्यवस्थापन समितीला संवर्धनाकरिता गाव हद्दीतील १५३ हेक्टर जंगल सुपूर्द करण्यात येईल. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची ग्वाही, उपवनसंरक्षक युवराज यांनी दिली. या दरम्यान नवेगावबांध येथील ओबीसी प्रवर्गातील २३२ लाभार्थ्यांपैकी ५० लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. चुटीया (झाशीनगर) येथील सखाराम मंगरु परसो यांचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी सुभद्रा सखाराम परसो हिला वनविभागाच्या वतीने ७ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. निधी उपलब्ध असतानाही नवेगावबांध पर्यटन संकुल विकासाचे काम कसे रेंगाळले या विषयीची खंत रामदास बोरकर यांनी व्यक्त केली. उपस्थितांचे आभार सतिश कोसरकर यांनी मानले.

Web Title: Production of bamboo cluster for bamboo industry soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.