एक लाख रोपांची निर्मिती
By admin | Published: August 21, 2016 12:14 AM2016-08-21T00:14:16+5:302016-08-21T00:14:16+5:30
सामाजिक वनीकरण गोंदिया अंतर्गत येणाऱ्या लागवड अधिकारी परिक्षेत्र अर्जुनी-मोरगावच्या वतीने स्थानिक अर्जुनी-मोरगाव
४० प्रजातीची बीज प्रक्रिया : सामाजिक वनीकरणाची रोपवाटिका फुलली
बोंडगावदेवी : सामाजिक वनीकरण गोंदिया अंतर्गत येणाऱ्या लागवड अधिकारी परिक्षेत्र अर्जुनी-मोरगावच्या वतीने स्थानिक अर्जुनी-मोरगाव ते सानगडी रस्त्यालगत काही दिवसापूर्वी तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका उच्च तत्रज्ञानद्वारे रोप निर्मिती केली. बीज संकलन करून १ लाख रोपे फुलविले आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रदीप बडगे यांच्या मार्गदर्शनातून गावापासून एक ते दीड किमी अंतरावरील अर्जुनी-मोरगाव ते सानगडी रस्त्यालगत असलेल्या दर्शनीस्थळी उच्च तंत्रज्ञानावर आधारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेची निर्मिती २ हेक्टर परिसरात करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव कार्यालयातील प्रभारी लागवड अधिकारी लालचंद लांजेवार यांच्या नियोजनबध्द देखरेखखाली सदर रोपवाटिकेतील रोपांची दिवसागणीक वाढ होत आहे. हिरवे कंच वाढलेली रोपे ये-जा करणारांचे लक्ष वेधतात. विशेष म्हणजे सदर रोपवाटिकेत ठिकठिकाणाहून बीज संकलन करून कार्यरत मजुरांच्या हस्ते बीज-प्रक्रिया करून विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत उच्च तंत्रज्ञानानुसार रोपांची निर्मिती कुशल मजुराच्या हस्ते करण्यात येत आहे. आज घडीला रोपवाटिकेत सप्तपर्णी ११ हजार, जारूळ ११ हजार, आवळा ७ हजार, कॅशिया ६ हजार, आस्ट्रेलियन बाभूळ ५ हजार, हत्तीफळ ५ हजार, बेहळा ५ हजार, आंजन ५ हजार, कुडलिंब ४ हजार, शिवन ४ हजार, मोहा ४ हजार, करंजी ४ हजार, भेरा ३ हजार, प्लेटफार्म ३ हजार, सिंगापुरी ३ हजार, काळा सिरस ३ हजार, बकाम ३ हजार, घोगर ३ हजार, रोहन ३ हजार, सिताफळ, बिबा, येन,चार, चिचबिलाई, शिषम, वड, जांभूळ प्रत्येकी १ हजार, सिंदूर, रिटा, गुलमोहर, बेल, बहावा, पिपळ, लेन्ड्री, सागवान, हिरडा, आंबा अशा ७ बेडमधून १ लाख रोपाची निर्मिती करण्यात आली आहे. नवनिर्मित रोपवाटिकेत विशेष आकर्षित होण्यासाठी नवनवीन जातीच्या फुलझाडांची रोपे लावण्याच्या मनोदय सहायक प्रभारी लागवड अधिकारी लालचंद लांजेवार यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)