प्रगतिशील शेतकरी व गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:25+5:302021-07-03T04:19:25+5:30
गोंदिया : वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन व कृषी संजीवनी मोहीम समारंभाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले ...
गोंदिया : वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन व कृषी संजीवनी मोहीम समारंभाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी व गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे होते. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नीरज जागरे, प्रगतिशील शेतकरी राणे, अशोक उईके, ऋषीकुमार टेंभरे उपस्थित होते. याप्रसंगी घोरपडे यांनी, जिल्ह्यात धान लागवडीसाठी पट्टा व ड्रम सीडर पद्धतीने लागवड, ब्रिकेट, अझोला, ट्रायकोकार्ड, १० टक्के रासायनिक खत बचत करण्यासाठी कृषिक ॲपचा उपयोग, मग्रारोहयो फळबाग लागवड आदी विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पाटील यांनी स्व. वसंतराव नाईक यांचे जीवन व कार्य यावर प्रकाश टाकला. टेंभरे यांनी, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीपद्धती स्वीकारण्याचा आपल्या मनोगतातून सल्ला दिला. राणे व उईके यांनी, प्रगत कृषी तंत्रज्ञान वापरण्याबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमात शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ऋषीकुमार टेंभरे, जिल्हा तसेच गोंदिया तालुकास्तरावरील हरभरा पीक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसह सन २०२०-२१ मध्ये तालुकानिहाय सर्वाधिक लागवड केलेल्या कृषी सहायक तसेच उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
.............
या शेतकऱ्यांचा केला सत्कार
हरभरा पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक भुमेश्वर बांते (रा. सेलोटपार, तिरोडा), द्वितीय क्रमांक पदमलाल चौरीवार (रा. पारडीबांध, गोंदिया), तृतीय क्रमांक प्रभा मांडवे (रा. नवेगाव, गोंदिया) तर आदिवासी गटातून प्रथम क्रमांक राजू धुर्वे (रा. गुदमा), द्वितीय क्रमांक जितेंद्र कोराम (रा. कासा), तृतीय क्रमांक उदयसिंह सरोदे (रा. किडंगीपार) यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व रोपटे प्रदान करण्यात आले, तर मग्रारोहयोत सर्वांत जास्त फळबाग लागवड करणारे आमगावचे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण मुंडे तसेच कृषी सहायकांमध्ये रोशन भाणारकर (गोंदिया), हरिहर कोहड (गोरेगाव), विशाल साटकर (तिरोडा), एन. एन. बोरकर (अर्जुनी), एल. एल. धनगये (देवरी), नितीन मुंडे (आमगाव), एस. के. गणवीर (सालेकसा), जे. सी. वाढई (सडक-अर्जुनी) यांचा प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
--------------------------