पुरोगामी विचारांना संस्कृतीची जोड आवश्यक
By admin | Published: January 6, 2017 12:57 AM2017-01-06T00:57:58+5:302017-01-06T00:57:58+5:30
संस्कारक्षम शिक्षण प्रणालीचा शासनाने पुरस्कार करावा तरच संस्कारक्षम पिढी घडेल, नितीमूल्यांना
गजानन डोंगरवार : सावित्रीबाई शिशू मंदिरचे वार्षिकोत्सव
अर्जुनी-मोरगाव : संस्कारक्षम शिक्षण प्रणालीचा शासनाने पुरस्कार करावा तरच संस्कारक्षम पिढी घडेल, नितीमूल्यांना जपणारी पिढी घडेल. तंत्रज्ञानाच्या या युगात पुरोगामी विचारांची खूप गरज आहे. मात्र जोपर्यंत या प्रणालीला संस्कृतीची जोड मिळणार नाही तोपर्यंत पुरोगामी विचार तथ्यहिन आहेत, असे प्रतिपादन डॉ. गजानन डोंगरवार यांनी केले.
ते स्थानिक सावित्रीबाई शिशू मंदिर उच्च प्राथमिक शाळेत वार्षिकोत्सवाप्रसंगी मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे म्हणाले, हे यंत्रयुग आहे. मानवाने प्रचंड विकास केला आहे. रोज नवनवे शोध लागत आहेत. समाजात जीवन जगताना प्रत्येकाला अपडेट असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विलक्षण प्रतिभेचे धनी आहेत. त्यांनाही अद्यावत शिक्षणाची, मार्गदर्शनाची गरज आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था ही व्यावसायिक झाली आहे. या शिशू मंदिराने व्यावसायिक शिक्षण प्रणालीतही वेगळा पायंडा रोवला आहे. आधुनिक शिक्षण देताना आपल्या संस्कृतीचेही शिक्षण मुलांना दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
उद्घाटन तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांच्या हस्ते, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, न.पं. उपाध्यक्ष विजय कापगते, न.पं. सभापती माणिक मसराम, घनश्याम हातझाडे, मुख्याध्यापक आशा हातझाडे, पंढरी गहाणे, आनंद मेश्राम, अशोक कापगते उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांनी केले. दीप प्रज्वलन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांचे सरंक्षण यावर संदेशात्मक नाटिका सादर केली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा हातझाडे यांनी मांडले.
संचालन व आभार भोजराज मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी संगीता बावणे, प्रीती लाडे, अश्विनी बंसोड, रंजना गहाणे, रिना राऊत, रंजना ठाकूर, अमोला मेश्राम, फरहिनाझ पठाण, पारस कोचे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)