धरणे आंदोलनातून केला प्रशासनाचा निषेध
By admin | Published: January 8, 2017 12:30 AM2017-01-08T00:30:26+5:302017-01-08T00:30:26+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सोलापूर येथील कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येचा निषेध व्यक्त करीत येथील
इंजिनियर्स असोसिएशन उतरले मैदानात : परिमंडळ कार्यालयासमोर आंदोलन
गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सोलापूर येथील कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येचा निषेध व्यक्त करीत येथील सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनच्यावतीने परिमंडळ कार्यालयासमोर गुरूवारी (दि.५) धरणे आंदोलन करण्यात आले.
मोहोळ (सोलापूर) उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी २९ डिसेंबर रोजी प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनच्यावतीने प्रशासनाच्या विरोधात गुरूवारी (दि.५) परिमंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या द्वारसभेला असोसिएशनचे प्रादेशिक सचिव हरिश डायरे, परिमंडळाचे सहसचिव प्रशांत भोंगाडे, गोंदिया मंडळाचे सचिव सहास धामनकर, विभागीय सचिव कुमार कोकणे यांनी संबोधीत केली.
आंदोलनात सुनिल रेवतकर, सुनिल मोहुर्ले, खुशाल सोनी, अक्षय इंगळे, राजेश येडे, दिनेश बोंद्रे, विनय नेवारे, किशोर चौरागडे, अभिजीत भांदककर, सरोजसिंग परिहार, डिलेश बिसेन, विनीत वाहने, श्वेता मोरे, पी. सत्यदेव, गोकूल राठोड, वनश्री कुंभरे, पियुश पटले, विश्वजीत दुबे, निकेश शाहू, हर्षल बोंदे्र, प्रदीप मोहीतकर, शेखर पाल, हेमंत टेंभूर्णीकर, सुरज चव्हाण, अनुप ढोके, अजय गायधने, गिरीश मते, अजय दखने व अन्य उपस्थित होते.
दरम्यान परिमंडळाचे मुख्य अभियंता जी.म. पारधी यांना असोसिशएनच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)