जिल्ह्यातील प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:24 AM2018-09-15T00:24:27+5:302018-09-15T00:25:42+5:30

मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत.

Project in the district | जिल्ह्यातील प्रकल्प लबालब

जिल्ह्यातील प्रकल्प लबालब

Next
ठळक मुद्देजिल्ह्यावर पावसाची मेहरबानी : लघु, मध्यम प्रकल्प व तलावही फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत. अशात येत्या दिवसांत आणखी पाऊस बरसल्यास उरलेले प्रकल्प व तलावही भरणार यात शंका दिसत नाही.
मागील वर्षी पावसाने नाराजी दाखविली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत ठणठणाट होता. यंदाही पाऊस दगा तर देणार नाही ना अशी भिती होती. मात्र हवामान खात्याने यंदा वर्तविलेला अंदाजही खरा ठरला व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांत भरभरून पाणीसाठा आहे. यात इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६६.२८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ६३.७८ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ९५.५९ टक्के तर कालीसराड प्रकल्पात ९४.८२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.
या चार मुख्य प्रकल्पांची ही स्थिती असतानाच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर व कटंगी हे पाच प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर चुलबंद प्रकल्पात ६९.८२ टक्के, खैरबंधा प्रकल्पात ९०.०५ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ९८.८२ टक्के पाणासाठा आहे. तसेच २२ लघु प्रकल्पांतील डोंगरगाव, गुमडोह, कालीमाती, मोगरा, पिपरीया, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी व बेवारटोला हे १० प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर आक्टीटोला प्रकल्पात ८८.८५ टक्के, हरी ९२.२१, रेहाडी ८२.२३, सडेपार ७६.३५, सेरपार ७१.२७, वडेगाव ९३.९३, उमरझरी ९५.८३ टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रकारे, जिल्ह्यातील ३८ मालगुजारी तलावांतील भानपूर, चान्नाबाक्टी, फुलचूर, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, खमारी, काटी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा, पळसगाव सौं, पालडोंगरी, पळसगाव डव्वा, पुतळी, सौंदड, तेढा या २० तलावांत १०० टक्के भरलेले आहेत. शिवाय उर्वरीत तलावांतील बहुतांश तलाव ५० टक्केच्यावर भरलेले आहेत.
यंदा रबीचा हंगाम होणार
मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे प्रकल्पांत पाणीसाठा नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रब्बीसाठी पाणी न देण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्यानंतर रबीचा हंगामही शेतकऱ्यांना घेता आला नव्हता. यंदा मात्र चांगला पाऊस झाला असून आता उर्वरीत काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार असे बोलता येईल. असे झाल्यास रबीचा मार्ग मोक ळा होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Web Title: Project in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी