प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:14+5:30

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवून दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला पाणीदार करून सर्वांनाच खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच प्रामुख्याने शेतकऱ्यांनाही संकटातून बाहेर काढले. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे आटोपता आली व त्यांची चिंता सुटली.

The project is over | प्रकल्प लबालब

प्रकल्प लबालब

Next
ठळक मुद्देमुसळधार पावसाची करामत : कित्येक रस्त्यांवर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऑगस्ट महिन्यातील पावसाने जिल्हा पाणीदार झाला असतानाच प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली होती. मात्र गुरूवारी बरसलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले, तलाव तुडूंब भरले. तर जिल्ह्यातील प्रकल्पांतही पाणीसाठा वाढला असून आजघडीला सर्वच प्रकल्प पाण्याने लबालब भरले आहेत. पावसाने अशीच साथ दिल्यास प्रकल्पांतील पाणीसाठा कायम राहणार व त्यामुळे उन्हाळ््यातील पाण्याची समस्या सुटणार यात शंका नाही.
जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवून दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला पाणीदार करून सर्वांनाच खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच प्रामुख्याने शेतकऱ्यांनाही संकटातून बाहेर काढले. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे आटोपता आली व त्यांची चिंता सुटली. आता मागील आठवडाभरापासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे कोरडेठाक असलेल्या नदी-नालेस तलाव व प्रकल्पांचीही तहान विजविली. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले व तलाव भरले आहेत.
अशातच मात्र गुरूवारच्या (दि.२०) मुसळधार पावसाने अवघ्या जिल्ह्याला झोडपून पुरच आणला होता. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांतही चांगलाच पाणीसाठा झाला आहे. आजघडीला जिल्हयातील सर्वच प्रकल्प पाण्याने लबालब भरलेले असून पुढे बरसणाºया पावसाने प्रकल्प पूर्णपणे भरून पुढे त्याचा जिल्ह्याला फायदा होणार.
गुरूवारच्या या पावसामुळे एकीकडे शेतकरी सुखावलेला असतानाच नदी-नाले व तलावांचे पाणी शेतात शिरल्याने कित्येक शेतकºयांच्या शेतातील धान पीक वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, पावसाने उघाड दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र तरिही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे नदी-नले ओसंडून वाहत असतानाच अद्याप कित्येक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद पडून आहेत. त्यात काही प्रकल्पांचे गेट उघडले जात असल्याने नदी-नाल्यांची पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसत आहे.

प्रकल्पांतील पाणीसाठा ७० टक्के पार
गुरूवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत ७० टक्केच्या वर पाणीसाठा दिसून येत आहे. यामध्ये, इटियाडोह प्र्रकल्पात ७०.२७ टक्के पाणीसाठा आहे. सिरपूर प्रकल्पात ७१.७१ टक्के पाणीसाठा आहे. पुजारीटोला प्रकल्पात ८७.१० टक्के पाणीसाठा असून कालीसरास प्रकल्पात थोडा कमी मात्र ६३.३६ टक्के पाणीसाठा आहे.

पुजारीटोलाचे ४ गेट उघडून
गुरूवारच्या पावसामुळे पुजारीटोला प्रकल्पाचे १२ गेट उघडण्यात आले व त्यातून पाणी सोडले गेले. आता प्रकल्पाचे ४ गेट उघडेच असून पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे, पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यानेच गरज पडल्यास गोंदिया शहराचीही उन्हाळ््यात भागविली जाते. यामुळे पुजारीटोला प्रकल्पात पाणीसाठा असणे अत्यंत गरजेचे असून या पावसामुळे ही समस्या सुटणार असल्याचे दिसते.

Web Title: The project is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.