जिल्ह्यातील प्रकल्प ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:48 PM2019-04-22T21:48:57+5:302019-04-22T21:50:09+5:30

जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.

Project Oxygen in the District | जिल्ह्यातील प्रकल्प ऑक्सिजनवर

जिल्ह्यातील प्रकल्प ऑक्सिजनवर

Next
ठळक मुद्देपाणीसाठा घटत चालला : मध्यम व लघु प्रकल्पही कोरडे

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.
पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, पावसाळ््याला आणखी महिनाभर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांत पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता पाण्याचे नियोजन करणे खरच गरजेचे आहे असे दिसून येते.
जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांतील सर्वात मोठे प्रकल्प म्हणजे इटियाडोह असून ३१७.८७ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात आजघडीला ७८.४३ दलघमी एवढा पाणी साठा असून त्याची २४.६७ एवढी टक्केवारी आहे. सिरपूर प्रकल्पाची १५९.७८ दलघमी एवढी क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात ३५.८८ दलघमी एवढा पाणीसाठा असून त्याची २२.४५ एवढी टक्केवारी आहे. पूजारीटोला प्रकल्पाची ४३.५३ दलघमी पाणी साठवण क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात १३.०६ दलघमी पाणीसाठा असून त्याची ३० एवढी टक्केवारी आहे.
या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना जिल्ह्यातील अन्य नऊ मध्यम व २२ लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर प्रकल्पांची स्थितीही बरी नाही. या प्रकल्पांतही मोजकाच पाणीसाठा असल्याने उन्हाळ््यात तेही साथ सोडणार असल्याचे दिसते. फक्त कटंगी प्रकल्पात आजघडीला ३५.४३ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ३९.३९ टक्के पाणीसाठा दिसून येत आहे. शिवाय लघु प्रकल्पांचीही स्थिती कही बरी नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारे हे प्रकल्प असून आणखी दोन महिन्यांत हे प्रकल्प मात्र आटणार असल्याचेही दिसते.
मामा तलावही आटले
एकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार या तलावांची स्थितीही काही ठीक नाही. मामा तलावातून अवघ्या गावांचा वापर होत होता. शिवाय शेतीची सुद्धा सोय होऊन जात होती. आजघडीला मात्र मामा तलावांनाच जीवनदानाची गरज आहे. तलावांतील गाळ काढून त्यांना जीवनदान मिळाल्यास हेच तलाव पुन्हा गावांसाठी जीवनदायी ठरणार.

Web Title: Project Oxygen in the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.