जिल्ह्यातील १४ महसूल सहायक यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:28+5:302021-06-19T04:20:28+5:30

गोंदिया : जिल्ह्यात महसूल विभागात २०१८ पासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न निकाली काढण्याबाबत वारंवार निवेदन देऊनसुद्धा महसूल कर्मचाऱ्यांचे प्रश्न ...

Promotion to 14 Revenue Assistants in the district | जिल्ह्यातील १४ महसूल सहायक यांना पदोन्नती

जिल्ह्यातील १४ महसूल सहायक यांना पदोन्नती

Next

गोंदिया : जिल्ह्यात महसूल विभागात २०१८ पासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न निकाली काढण्याबाबत वारंवार निवेदन देऊनसुद्धा महसूल कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली निघत नव्हते. परंतु, जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेताच संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना महसूल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले.

महसूल सहायक संवर्गातून अव्वल कारकून या संवर्गात पदोन्नती देताना शासन नियमानुसार विविध टप्पे पार करून ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून त्यावर सात दिवसांच्या आत आक्षेप मागविण्यात आले. दुसऱ्याच दिवशी जिल्हा निवड समितीची बैठक आयोजित करून १५ जून रोजी सर्व महसूल सहायक यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले एकूण १४ महसूल सहायक यांना अव्वल कारकून या संवर्गात वेळेच्या आत पदोन्नती देऊन कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देखील देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ही कार्यवाही केवळ दहा दिवसांतच पूर्ण केल्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभागात जिल्हाधिकारी यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Promotion to 14 Revenue Assistants in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.