सुलभ निवडणुकीसाठी योग्य नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:36 PM2019-08-27T22:36:20+5:302019-08-27T22:36:48+5:30

मतदारांना विविध सोयी-सुविधा तसेच त्यांच्या अनेक अडी-अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विभागनिहाय विधानसभा निवडणूक तयारी पूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.

Proper planning should be done for easy election | सुलभ निवडणुकीसाठी योग्य नियोजन करावे

सुलभ निवडणुकीसाठी योग्य नियोजन करावे

Next
ठळक मुद्देकांदबरी बलकवडे : विधानसभा निवडणूक तयारीपूर्व आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आगामी विधानसभा निवडणूक २०१९ करिता भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोष वाक्य जाहीर केले आहे. मतदारांना विविध सोयी-सुविधा तसेच त्यांच्या अनेक अडी-अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विभागनिहाय विधानसभा निवडणूक तयारी पूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.
येत्या ३१ ऑगस्ट रोजी मतदार यादीचे प्रकाशन होणार असून निकाली काढण्यात आलेले दावे, हरकतीच्या उच्चतम तपासणीचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. या बैठकीत कायदा-सुव्यवस्था तसेच मतदान केंद्रावर दिव्यांग व वयोवृध्द मतदारांसाठी विशेष सुविधा,नोडल आॅफिसर नियुक्त करणे, निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रचार प्रसार करणे, अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सी.सी.टिव्ही कॅमरे, तसेच निणडणुकीचे सर्व महत्त्वाचे कामे दिलेल्या वेळेच्या आत करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन जवाबदारी निश्चित करण्यात आली. नवमतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन निवडणुकीच्या उत्सवात सहभागी करण्याची सूचना देण्यात आल्या. तसेच स्वीप कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात प्रचार प्रसार करुन मतदारांच्या अधिकाराची जाणीव करुन देणे याबाबत आढावा घेण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे,निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, राहुल खांडेभराड, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी विजय चव्हान, कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हान, कोषागार अधिकारी व्ही.ए.जवंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्र.वि.बुलकुंडे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, सहाय्यक सुरेश वासनीक, जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव, निवडणूक विभागाचे हरीशचंद्र मडावी,अधीक्षक आर.एस.पटले, प्रवीण जमधाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Proper planning should be done for easy election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.