योग्य वापर व पाण्याची बचत हाच उपाय

By admin | Published: May 28, 2016 01:50 AM2016-05-28T01:50:15+5:302016-05-28T01:50:15+5:30

‘लोकमत’ समूहाने सामाजिक बांधिलकीतून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला आता शहरासोबत ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत आहे.

Proper use and water savings are the only solution | योग्य वापर व पाण्याची बचत हाच उपाय

योग्य वापर व पाण्याची बचत हाच उपाय

Next

पाणी जिरवा : मान्यवरांकडून ‘जलमित्र अभियाना’चे कौतुक
गोंदिया : ‘लोकमत’ समूहाने सामाजिक बांधिलकीतून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला आता शहरासोबत ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत आहे. पाण्याचे महत्व प्रत्येकाला कळण्यासाठी आणि जे लोक पाण्याची बचत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमतचे हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
पाणी वाया घालवू नका
पाण्याची टंचाई हा सर्वांसाठीच गंभीर प्रश्न होत आहे. आता पाणी वाया जाणार नाही यासाठी मोठे हॉटेल मालक, मोठे बंगले बांधणारे नागरिक यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण भागातील विहीरी किंवा हातपंपाच्या जवळ खड्डा खोदून पाणी वाया जाणार नाही अशी व्यवस्था करावी. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. लोकमतचे जलमित्र अभियान अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. हे अभियान जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरो, हीच शुभेच्छा.
-डॉ. विजय सूर्यवंशी
जिल्हाधिकारी, गोंदिया
पाणी हे जीवन आहे,
ते वाचवा
जि.प.कडून पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविली जाते. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यावा. पाणी बचत भविष्याचे जीवन फुलविणारी आहे. यासाठी लोकमतच्या उपक्रमाला नागरिकांनी हातभार लावावा, तसेच पाणी बचतीची कास धरावी.
- उषाताई मेंढे
जि.प. अध्यक्ष, गोंदिया.

दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी अत्यावश्यक
पाण्यावाचून जीवन विनाशाकडे वाटचाल करेल. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ही परिस्थिती आता हळूहळू सगळीकडे येत आहे. त्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे हा मार्ग प्रत्येकाने अवलंबणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ने दिलेल्या दिशेचा समाजमनावर चांगला प्रभाव पडत आहे. भविष्याच्या सुखासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. गोंदिया
- तर उद्या तहानच
घेईल जीव
आज पाणी वाया जाईल तर उद्या तहान जीव घेईल. यासाठी प्रत्येकाने ‘जल ही जीवन है’ या वाक्प्रचारातून अर्थबोध घ्यावा. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. परंतु पाण्याचा संचय होत नाही. पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी आता प्रत्येकाने ही चळवळ हातात घेऊन राष्ट्रीय कामात सहकार्य करायला हवे.
-लीलाधर पाथोडे
राज्य सहसचिव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना
वेळ आहे,
आताच सावरा
गोंदिया जिल्ह्यात चांगला पाऊस पडतो. परंतु त्या पाण्याला संचय करून ठेवण्यासाठी नागरिकांनी वेळीच सावरले पाहिजे. अन्यथा एक दिवस पाणी जीव घेईल. लोकमचा उपक्रम दिशा देणारा आहे. मराठवाड्यासारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाचे पाणी जमीनीत कसे मुरविता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे.
-मुकुंद धुर्वे
संवर्धन अधिकारी, सातपुडा फाऊंडेशन गोंदिया.

दखल घेतली नाही तर पुढील पिढीचे मरण
गोंदियासारख्या तलावांच्या जिल्ह्यात पाण्याची पातळी खालावली आहे. गावोगावचे छोटे तलाव नष्ट होत आहेत. हा संदेश बरेच काही सांगणारा आहे. त्यामुळे आताच सावध होणे गरजेचे आहे. लोकमतने त्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे.
- तीर्थराज उके
विस्तार अधिकारी

‘लोकमत’चे अभियान प्रेरणादायी
गोंदिया शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यातच यापूर्वी कधीही जाणवले नाही एवढी पाणीटंचाई यावर्षी जाणवत आहे. यामागील कारण म्हणजे अनेक लोकांनी जमिनीत बोअरवेल खोदल्या आहेत. त्यामुळे ते लोक पाण्याचा वापरही अनियंत्रितपणे करतात. बोअरवेल किती खोदायच्या यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाचा स्वतंत्र विभाग असला तरी त्यांचे त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे वेळीच सावरले नाही तर मराठवाड्यासारखी स्थिती पुढील पाच वर्षानंतर गोंदियातही पहायला मिळेल. पाणी हे अमूल्य आहे. ते तयार करता येत नाही. त्याचे मोल सर्वांना जाणून काटकसरीने पाण्याचा वापर केला पाहीजे. आज शहराच्या मध्यवस्थीत नागरिकांच्या नळांना पुरेसे पाणी येत नाही. त्यामुळे खासगी टँकर लावून मी लोकांना पाणी पुरविण्याची व्यवस्था करीत आहे. पण केवळ पाणी पुरवठा करणे एवढाच माझा उद्देश नसून लोकांना पाण्याचे महत्व कळावे यासाठीही जनजागृती केली जात आहे. लोकमतचे जलमित्र अभियान खरंच प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने या अभियात स्वत:ला झोकून द्यावे.
- अशोक ऊर्फ गप्पू गुप्ता
नगरसेवक, गोंदिया

Web Title: Proper use and water savings are the only solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.