मालमत्ता कर कार्यालय सकाळी ८ वाजताच उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:44+5:302021-05-19T04:30:44+5:30
गोंदिया : शहरवासीयांना त्यांच्याकडील मालमत्ता कराचा भरणा किंवा मालमत्तांना घेऊन असलेल्या अन्य कामांना घेऊन सोय व्हावी यासाठी गुरूवारपासून (दि.२०) ...
गोंदिया : शहरवासीयांना त्यांच्याकडील मालमत्ता कराचा भरणा किंवा मालमत्तांना घेऊन असलेल्या अन्य कामांना घेऊन सोय व्हावी यासाठी गुरूवारपासून (दि.२०) मालमत्ता कर विभागाचे कार्यालय सकाळी ८ वाजतापासूनच उघडण्यात येणार आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले असून सकाळी ११ वाजतानंतर संचारबंदी केली जात आहे. अशात ११ वाजतानंतर नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी असून अशात बाहेर आढळून आलेल्या नागरिकांवर कारवाया केल्या जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना त्यांच्याकडील मालमत्ता कराचा भरणा किंवा मालमत्तेशी संबंधित अन्य काही महत्वाची कामे असल्यास त्यांची अडचण होत आहे. विशेष म्हणजे, मालमत्ता कराची पावती नसल्यास अन्य कित्येक कामे खोळंबून पडतात. करिता नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी नगर परिषदेने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी नगर परिषदेतील मालमत्ता कर विभागाचे कार्यालय गुरुवारपासून (दि.२०) सकाळी ८ वाजताच उघडण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांना ३ तासांचा वेळ मिळणार असून त्यांना आपली कामे आटोपता येतील.