सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:35 PM2018-12-08T20:35:01+5:302018-12-08T20:36:46+5:30

शहरातील सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नगरसेवक पंकज यादव यांची धडपड सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी नगर परिषदेला १६ डिसेंबर २०१५ पत्र पाठवून यासाठी सहमती दर्शविली.

The proposal for beautification of the government lake is in the cold storage | सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव थंडबस्त्यात

सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव थंडबस्त्यात

Next
ठळक मुद्देतीन वर्षांपासून फाईल धूळखात : सौंदर्यीकरणाचा विषय रखडला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नगरसेवक पंकज यादव यांची धडपड सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी नगर परिषदेला १६ डिसेंबर २०१५ पत्र पाठवून यासाठी सहमती दर्शविली. तसेच ५ वर्षांचा करार करण्याचे पत्रात नमूद के ले होते. मात्र ३ वर्षे लोटूनही रेल्वेचा प्रस्ताव थंडबस्त्यात आहे. परिणामी सरकारी तलावाचे सौंदर्यीकरण रखडत चालले आहे.
रेल्वेच्या मालकीच्या सुमारे २० एकर जागेत सरकारी तलाव आहे. शहरातील महत्वपूर्ण अशी ही जागा असून हा तलावही तेवढाच महत्वाचा ठरत आहे. तलाव सुरक्षीत रहावा तसेच त्याची देखभाल-दुरूस्ती होऊन शहरवासीयांना एक चांगली जागा फिरण्यासाठी उपलब्ध व्हावी. यादृष्टीकोनातून नगरसेवक यादव सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्नरत आहेत.
त्यामुळे सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय रेल्वेच्या अधिकाऱ्यांपुढे अनेकदा उपस्थित करण्यात आला. शिवाय माजी खासदार नाना पटोले यांनीही याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची या विषयावर सभा घेणार होते मात्र आत्ता याचा या सर्वांनाच विसर पडला आहे. सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी रेल्वेने सहमती दर्शवित नगर परिषद मुख्याधिकाºयांना १६ डिसेंबर २०१५ रोजी पत्र पाठविले होते. पत्रात त्यांनी ५ वर्षांचा करार करण्यास म्हटले होते. मात्र नगर परिषदेने या विषयावर काहीच पाऊल उचलले नाही. परिणामी आता ३ वर्षे लोटूनही यावर कुठलीच कारवाही करण्यात आली नाही.
सिव्हील लाईन्स बोडीसह शहरात सरकारी तलाव ही एक बहुमूल्य संपत्ती जोपासता आली असती असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
१२ तारखेच्या सर्वसाधारण सभेत विषय मांडणार
सरकारी तलावाची सफाई व सौंदर्यीकरण करण्यात यावे यासाठी नगरसेवक यादव मागील कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. शहराला लाभलेल्या या संपत्तीचे जतन करता यावे यासाठी त्यांनी विविध खासदार, आमदार व नगर परिषदेच्या माध्यमातून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केला. १६ डिसेंबर २०१५ ला रेल्वेकडून प्राप्त पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. नगर परिषदेत धूळखात पडून असलेली सरकारी तलाव सौंदर्यीकरणाची फाईल पुन्हा काढली आहे. तलाव सौंदर्यीकरणाचा हा विषय त्यांनी आता नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: The proposal for beautification of the government lake is in the cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार