प्रस्तावित दोन एस्कलेटर वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:32 PM2018-06-12T22:32:19+5:302018-06-12T22:32:19+5:30

रेल्वे विभागाच्या नवीन गाईडलाईननुसार एक लाख प्रवाशांचे ये-जा असलेल्या रेल्वे स्थानकांनाच एस्कलेटर देण्यात येणार आहे. यामुळे येथील रेल्वे स्थानक प्रशासनाकडून प्रस्तावीत करण्यात आलेले आणखी दोन एस्कलेटर आता अडचणीत आल्याचे चित्र आहे.

The proposed two escalators are in the air | प्रस्तावित दोन एस्कलेटर वांद्यात

प्रस्तावित दोन एस्कलेटर वांद्यात

Next
ठळक मुद्देतीन एस्कलेटरचा होता प्रस्ताव : नवीन गाईडलाईनमुळे आली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वे विभागाच्या नवीन गाईडलाईननुसार एक लाख प्रवाशांचे ये-जा असलेल्या रेल्वे स्थानकांनाच एस्कलेटर देण्यात येणार आहे. यामुळे येथील रेल्वे स्थानक प्रशासनाकडून प्रस्तावीत करण्यात आलेले आणखी दोन एस्कलेटर आता अडचणीत आल्याचे चित्र आहे. येथील रेल्वे स्थानकावर नुकतेच एक एस्कलेटर सुरू करण्यात आले असून आता त्यावरच समाधान मानावे लागणार आहे.
रेल्वे विभागाकडून रेल्वे स्थानकांचा कायापालट करून प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. येथील रेल्वे स्थानक व्यवस्थापनाकडून तीन एस्कलेटर लावण्याकरीता प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यापैकी एक एस्कलेटर दोन दिवसांपूर्वीच लावण्यात आले. मात्र प्रस्तावीत अन्य दोन एस्कलेटर केव्हा लावण्यात येणार याबाबत येथील अधिकाऱ्यांना माहिती नाही. नागपूर येथील अधिकारीही याबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. बहुतांश अधिकाºयांनी प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविल्याने आता यावर रेल्वेचे केंद्रीय अधिकारीच निर्णय घेणार असल्याचे सांगीतले. हे सर्व सुरू असताना रेल्वे विभागाच्या नवीन गाईडलाईन आल्या आहेत. यानुसार ज्या रेल्वे स्थानकावर एक लाखापेक्षा जास्त प्रवाशी ये-जा करतात त्याच रेल्वे स्थानकावर दोन एस्कलेटर देता येणार आहे. तर गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज २० हजार प्रवाशाची ये-जा करतात. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर दोन एस्कलेटर मिळण्याची शक्यता फार कमी आहे. नवीन गाईडलाईननुसार गोंदिया रेल्वे स्थानकाकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर कोणताही अधिकारी सकारात्मक निर्णय घेण्याचा विचारही करू शकणार नाही. मात्र ही बाब तेवढीही अशक्य नसून येथील लोकप्रतिनिधींनी जोर लावल्यास गोंदिया रेल्वे स्थानकासाठी प्रस्तावीत एक्सलेटरचा मार्ग मोकळा होऊ शकतो. असे झाल्यास उत्तर दिशेतील तिकिट घरासमोर एक एस्कलेटर सुरु करण्यात आल्यास त्या भागातील प्रवाशांसाठी सोयीचे होणार आहे.

Web Title: The proposed two escalators are in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे