समृद्ध महाराष्ट्र ‘जनकल्याण’ फसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:32 AM2018-02-24T00:32:40+5:302018-02-24T00:32:40+5:30

महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.

Prosperous Maharashtra 'Janakalyan' cropped up | समृद्ध महाराष्ट्र ‘जनकल्याण’ फसले

समृद्ध महाराष्ट्र ‘जनकल्याण’ फसले

Next
ठळक मुद्देकेवळ २६ टक्के कामे : अमृत कुंड, शेततळी, वृक्षारोपणाचा अभाव

नरेश रहिले ।
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.
राजस्थान व मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ सुरू करण्याचा निर्णय आॅक्टोबर २०१६ मध्ये राज्य सरकारने घेतला. या योजनेतून अहिल्यादेवी सिंचन विहिरी, अमृत कुंड शेततळी, भूसंजीवनी वर्मी कंपोस्टिंग, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव, तलाव व जल संरक्षणाहस ११ सूत्री कामांना पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी योजनेची घोषणा केली. यासाठी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद केली होती. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलविणे, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट वाढविणे हा उद्देश होता.
या योजनेंतर्गत निर्मल व स्वच्छ बनवायचे होते. सरकारतर्फे ग्रामीण भागाची स्थिती सुधारण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली. योजनेंर्गत होणाऱ्या कामांसाठी गोंदिया जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचयातींनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. ११ सूत्री कामांसाठी ७५ हजार ८७१ अर्ज आले होते. यातील ७१ हजार ४८० अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. यातील १९ हजार ७७७ कामे सुरू आहेत. तर १२ हजार ३३ कामी पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक काम समृद्ध गाव तलावांचे झाले आहेत. ४६१ लोकांकडून शेततळ्यासाठी अर्ज करण्यात आले होते. परंतु ४४५ मंजुरी मिळाली आहे. २५० कामे सुरू असून १३१ कामे (५४.२३ टक्के) पूर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात एकही अमृत कुंड शेततळी नाही
‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ च्या ११ सुत्री कामांमध्ये अमृत कुंड शेततळीसाठी २६ अर्ज आले होते. यातील ४ अर्ज मंजूर करण्यात आले. परंतु यातील एकही काम करण्यात आले नाही. नंदनवन वृक्षारोपण योजनेसाठी १०८ अर्ज मंजूर करुनही एकही काम पूर्ण झाले नाही. १०४ कामे सुरू आहेत. अहिल्यादेवी सिंचन विहिरींसाठी ६९२ अर्ज आले होते. ५९६ अर्जाला प्रशासकीय व तांत्रीक मंजुरी देण्यात आली. ३४० कामे सुरू आहेत. १११ विहिरी तयार झाल्या आहेत. भूसंजीवनी कर्मी कंपोस्टिंगच्या२७९ पैकी १०८ कामे सुरू आहेत.१११ कामे पूर्ण झाले आहेत. भूसंजीवनी नापेड कंपोस्टिंगचे २५१ पैकी ३६ काम सुरू आहेत. तर ३० कामे पूर्ण झाले आहेत. समृद्ध गाव योजनेसाठी ५ हजार ४६६ अर्ज आले होते. ४ हजार ७०४ अर्जांना प्रशासकीय व तांत्रीक मान्यता मिळाली. ९९१ कामे पूर्ण झाले. तर १७५१ कामे सुरू आहेत.
निर्मल शोषखड्ड्यांचे २३.८० टक्के काम
या योजनेंतर्गत निर्मल शोषखड्ड्यांसाठी ३८ हजार ८९ अर्ज आले होते. यातील ३६ हजार ७ अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. यातील ९ हजार ६५ शोषखड्यांचे काम सुरू आहेत. तर ६ हजार ५४० (२३.८० टक्के ) शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहेत. निर्मल शौचालयाचे ३० हजार ३६५ अर्ज आले होते. यातील २९ हजार ८६ शौचालयांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. ८ हजार १२३ शौचालयाचे काम सुरू आहेत.तर ४ हजार ११९ (२६.७५ टक्के ) काम पूर्ण झाले आहेत.

Web Title: Prosperous Maharashtra 'Janakalyan' cropped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.