जलयुक्त शिवारमुळे १ लाख १८ हजार हेक्टरला संरक्षित सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:26 PM2018-11-12T21:26:20+5:302018-11-12T21:26:40+5:30

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ५९ हजार २६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे.

Protected irrigation of 1 lakh 18 thousand hectares due to water conservation | जलयुक्त शिवारमुळे १ लाख १८ हजार हेक्टरला संरक्षित सिंचन

जलयुक्त शिवारमुळे १ लाख १८ हजार हेक्टरला संरक्षित सिंचन

Next
ठळक मुद्दे६ हजार २६८ कामे पूर्ण : ५९ हजार टीसीएम पाणीसाठा, मागील तीन वर्षातील कामे, ०.३१ मीटरने भूजल पातळीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ५९ हजार २६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे.
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांमुळे मागील चार वर्षात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३४९.६१ मि.मी. इतके असून जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १११६.१३ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २३३.४८ मि.मी. कमी पर्जन्यमान म्हणजे १७.०१ टक्के घट झालेली आहे. मागील चार वर्षात पर्जन्यमानात साधारणत: २६ टक्के घट झालेली आहे.
चालू वर्षात सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात १६५ गावांची निवड करण्यात आली. या गावात ३ हजार ८२ कामे प्रस्तावित करण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर २७ हजार ५१६ टिसीएम पाणीसाठा निर्माण होणे अपेक्षित आहे. यातून ५५ हजार ३३ हेक्टर संरक्षित सिंचन वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गोंदिया जिल्ह्याची एकूण ३३ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली आहे.
पाणलोट क्षेत्रातील उताऱ्यानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र ३ भागात रन आॅफ झोन, रिचार्ज, स्टोरेज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक झोनमध्ये एक अशा एकूण ७९ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. या नोंदीत भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाल्याचे निर्दशनास आले आहे.
पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या ७९ निरीक्षण विहिरींच्या भूजलाच्या पातळीच्या नोंदी सप्टेंबर २०१८ अखेर घेण्यात आल्या. त्यानुसार पाच वर्षाची भूजलाची सरासरी पातळी २.१७ मीटर आहे. माहे सप्टेंबर २०१८ ची सरासरी पातळी २.३५ असून ०.१८ मीटर पाणी पातळीत वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ० ते १ मीटर भूजल पातळीत वाढ झाली आहे.
जलयुक्त शिवार योजना राबविण्यापूर्वी सन २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ही २.६६ मीटर व जलयुक्त शिवार अभियानांनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये सरासरी भूजल पातळी २.३५ मीटर होती. म्हणजेच ४ वर्षे पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटरने वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ०.२० मीटरने पाणी पातळीत वाढ झालेली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाणलोट क्षेत्रनिहाय सर्वेक्षणामध्ये काही महत्वाच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यापूर्वी पेक्षा आता ०.३१ मीटर भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सलग ४ वर्षात पर्जन्यमानात घट झालेली असून भूजल पातळीत स्थिर राहण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे पूर्ण झाल्यामुळे उपलब्ध झालेल्या पाणी साठयामुळे शेतकºयांना शाश्वत सिंचनासाठी भूजल उपलब्ध झाले आहे.

Web Title: Protected irrigation of 1 lakh 18 thousand hectares due to water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.