गृहमंत्र्यांचा पुतळा जाळून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:30 AM2021-03-23T04:30:55+5:302021-03-23T04:30:55+5:30

सालेकसा : १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करीत रविवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्य ...

Protest against burning of Home Minister's statue | गृहमंत्र्यांचा पुतळा जाळून केला निषेध

गृहमंत्र्यांचा पुतळा जाळून केला निषेध

Next

सालेकसा : १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करीत रविवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्य मार्गावर त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला, तसेच आघाडी सरकारच्या निषेधार्थ प्रदर्शन करून तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष गुणवंत बिसेन, युवा मोर्चा अध्यक्ष आदित्य शर्मा, वरिष्ठ पदाधिकारी माजी अध्यक्ष खेमराज लिल्हारे, आदिवासी आघाडीचे जिल्हा महामंत्री शंकरलाल मडावी, व्यापारी आघाडीचे जिल्हा महामंत्री सुनील अग्रवाल, युवराज सुलाखे, कपूरचंद अग्रवाल, महामंत्री यादनलाल नागपुरे, युवा मोर्चा महामंत्री देवराम चुटे, महिला मोर्चा अध्यक्ष मधू अग्रवाल, महिला आघाडी सदस्य टिना चुटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष संजू कटरे, उपाध्यक्ष रामदास हत्तीमारे, बाबा दमाहे, अजय डोये, सदन मडावी, धीरेंद्र अग्रवाल, गुमानसिंग उपराडे, गल्लू दमाहे, गोविंद वरखंडे, विजय बिसेन, सुभाष टेंभरे, मुकेश इनवाते, मनोज इळपाते उपस्थित होते.

Web Title: Protest against burning of Home Minister's statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.