शेतकऱ्यांवरील लाठी हल्ल्याचा केला निषेध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:55+5:302021-09-02T05:02:55+5:30
गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शांतताप्रिय आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम पोलीस ...
गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शांतताप्रिय आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम पोलीस करीत आहेत. नुकताच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला. या घटनेचा राज्य किसान सभेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधिकारी सिन्हा यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना देण्यात आले आहे.
केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. ते कायदे मागे घेण्यात यावे, यासाठी दिल्ली राज्यासह अनेक राज्यामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. २८ ऑगस्ट रोजी हरियाणा राज्यातील करनाल शहरात शेतकऱ्यांनी केलेल्या शांतीपूर्ण रस्ता रोको आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांना पोलिसांनी लाठी हल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. हा अमानुष हल्ला असून या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिकारी यांच्यावर बडतर्फ कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, ते तीन कायदे मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा किसान सभेच्या वतीने देण्यात आले. यावेळी हौसलाल रहांगडाले, रामचंद्र पाटील, प्रल्हाद उके, घनश्याम गजभिये, दिनेश रामटेके व शेतकरी उपस्थित होते.