चुरडी येथील हत्याकांडाचा पोवार समाजाच्या वतीने निषेध ();
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:32 AM2021-09-23T04:32:40+5:302021-09-23T04:32:40+5:30
गोरेगाव : तिरोडा तालुक्यातील चुरडी येथे २१ सप्टेंबर रोजी झालेल्या हत्याकांडातील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा, ...
गोरेगाव : तिरोडा तालुक्यातील चुरडी येथे २१ सप्टेंबर रोजी झालेल्या हत्याकांडातील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदार सचिन गोस्वावी यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय पोवार समाज संघटना गोरेगाव, क्षत्रिय पोवार समाज संघटना मुंडीपारचे पदाधिकारी समाजबांधव उपस्थित होते. राष्ट्रीय पोवार समाज संघटनेचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव दिलीप चव्हाण हिरापूरचे बबलू बिसेन, गुड्डू कटरे, मोरेश्वर रहांगडाले, बिलकराम कटरे, राहुल कटरे, दिलीप रहांगडाले, क्षत्रिय पोवार समाज संघटना मुडीपारचे माजी अध्यक्ष बी.जी.कटरे, अध्यक्ष नरेश चौधरी, सचिव मोरेश्वर चौधरी, संघटक राजेश चौधरी, उपाध्यक्ष फागेंद बिसेन, टुकेंद्र भगत, कार्यवाह उमेद्र ठाकूर, सल्लागार शंकर बिसेन, सदस्य राजेंद्र बिसेन, लोकेश रहांगडाले, छत्रपाल बिसेन, खुमेंद्र ठाकूर उपस्थित होते. तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. त्या दिशेने तातडीने सीबीआय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.